मुंबईत दंगली घडवण्यासाठी २००४ साली उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर बैठक घेतली होती. या बैठकीत चर्नी रोड आणि दक्षिण मुंबईतील मुस्लीम फेरीवाल्यांवर हल्ले करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते, असा खळबळजनक आरोप भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. तसेच यावेळी त्यांनी संजय राऊतांवरही टीकास्र सोडलं.

हेही वाचा – शरद पवारांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “सामनाला…”

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान

नेमकं काय म्हणाले नितेश राणे?

“उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात विविध दंगलींबाबत प्रतिक्रिया देताना आमचं महायुतीचं सरकार दंगली घडवतंय असा आरोप केला आहे. मात्र, १३ ऑगस्ट २००४ रोजी ‘मातोश्री’वर त्यांनी स्वत: दंगल घडवण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीला एका खासदारासह तीन जण उपस्थित होते. त्यात स्वत: उद्धव ठाकरे सुद्धा होते. १९९२-९३ साली जशा दंगली घडल्या, तशीच दंगल आपल्याला घडवायची आहे. त्यासाठी चर्नी रोड आणि दक्षिण मुंबईतल्या भागातील मुस्लीम फेरीवाल्यावर वस्तऱ्याने हल्ले करावे, असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले होते”, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

हेही वाचा – “संजय राऊत सर्वात मोठा लँड माफिया, कैदी नंबर ८९५९ राऊतने…” नितेश राणेंचा आरोप

पुढे बोलताना, “गेल्या ९ महिन्यांपासून महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होत असून त्यात उद्धव ठाकरे आणि टोळीचा हात आहे, याची चौकशी गृहखात्याने केली पाहिजे”, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा – “…तरच विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयात हस्तक्षेप होऊ शकतो”, राहुल नार्वेकरांनी सांगितला नियम!

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊतांवरही टीकास्र सोडलं. “संजय राऊत हा किती मोठा लँड माफिया आहे, हे मी महाराष्ट्राला सांगतो आहे. अलिबागच्या किहीम बीचवर संजय राऊतला जागा हवी होती. त्यामुळे मराठी कुटुंबाकडून कवडीमोल भावात दमदाटी करून जागा घेतली. किहीम बीचवर रिसॉर्ट बांधण्याचे त्याचे मनसुबे आहेत. कोट्यवधींची जमीन अवघ्या १० कोटींमध्ये घेतली. दुसऱ्यांना माफिया बोलणारा संजय राऊत किती मोठा लँड माफिया आहे हे आता महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे”, असे ते म्हणाले.

Story img Loader