Cabinet Portfolio महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबरला पार पडला. त्यानंतर आज म्हणजे सहा दिवसांनी खातेवाटप जाहीर झालं आहे. अर्थ खातं अजित पवारांना तर गृह खातं देवेंद्र फडणवीसांना हे विभाग सारखेच राहिले आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं देण्यात आलं आहे. महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या महायुतीच्या पाच नेत्यांकडे कुठली खाती आहेत आपण जाणून घेऊ.

महाराष्ट्रातले चर्चेतले महायुतीचे पाच मंत्री कोण?

शिवसेनेचे भरत गोगावले, संजय शिरसाट, संजय राठोड भाजपाचे नितेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवाळ यांना कुठली खाती मिळणार? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्यानुसार या पाच जणांना कुठली खाती मिळाली आपण जाणून घेऊ.

Dilip Walse Patil :
Dilip Walse Patil : “१५०० मतांनी निवडून आलोय अन् काय सांगू मला मंत्री करा?”, दिलीप वळसे पाटलांचं विधान चर्चेत
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Cabinet Portfolio Allocation
Cabinet Portfolio Allocation : मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर; कोणतं खातं कोणाकडे? वाचा संपूर्ण यादी
Sanjay Shirsat On Guardian Minister Post
Sanjay Shirsat : खातेवाटप जाहीर होताच पालकमंत्री पदावरुन महायुतीत रस्सीखेच? शिंदे गटाच्या ‘या’ मंत्र्याचा मोठा दावा
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. त्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरु असताना खाते वाटप होईल असं वाटतं होतं. मात्र, आठवडा झाला तरी खातेवाटप होत नव्हतं. मात्र, आज अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. खरं तर महायुतीत गृहखात्यासाठी शिवसेना (शिंदे) आग्रही असल्याचं बोललं जात होतं. मात्र, गृहखातं सोडण्यास भाजपाने नकार दिला होता. अखेर गृहखातं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवण्यात आलं आहे.

चर्चेतील पाच मंत्र्यांकडे कुठली खाती?

भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन

संजय शिरासाट – सामाजिक न्याय

संजय राठोड – मृदू व जलसंधारण

नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे

नरहरी झिरवाळ – अन्न आणि औषध प्रशासन

महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांची संपूर्ण यादी, वाचा!

क्रमांकमंत्र्यांचं नावखातं
देवेंद्र फडणवीस गृहखातं
एकनाथ शिंदेनगरविकास आणि गृहनिर्माण
अजित पवारअर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क
चंद्रशेखर बावनकुळेमहसूल
राधाकृष्ण विखे पाटीलजलसंधारण
हसन मुश्रीफवैद्यकीय शिक्षण
चंद्रकांत पाटीलउच्च तंत्र शिक्षण
गिरीश महाजन जलसंपदा
गुलाबराव पाटीलपाणीपुरवठा
१०धनंजय मुंडेअन्न व नागरी पुरवठा
११दादाजी भुसे शालेय शिक्षण
१२गणेश नाईकवनखातं
१३संजय राठोडमाती व पाणी परीक्षण खात
१४मंगलप्रभात लोढाकौशल्य विकास
१५उदय सामंतउद्योग व मराठी भाषा
१६जयकुमार रावलविपणन
१७पंकजा मुंडेपशुसंवर्धन आणि पर्यावरण
१८अतुल सावेओबीसी विकास, दुग्धविकास
१९अशोक उईकेआदिवासी विकास
२०शंभूराज देसाईपर्यटन व खाण स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
२१आशिष शेलारमाहिती व तंत्रज्ञान
२२दत्तात्रय भरणेक्रीडा व अल्पसंख्याक विकास
२३अदिती तटकरेमहिला व बालविकास
२४शिवेंद्रराजे भोसलेसार्वजनिक बांधकाम
२५माणिकराव कोकाटेकृषी
२६नरहरी झिरवाळअन्न व औषध प्रशासन
२७जयकुमार गोरेग्रामविकास आणि पंचायत राज
२८संजय शिरसाटसामाजिक न्याय
२९भरत गोगावलेरोजगार हमी व फलोत्पादन
३०नितेश राणेमत्स्य आणि बंदरे
३१प्रताप सरनाईकपरिवहन
३२बाबासाहेब पाटीलसहकार
३३मकरंद पाटीलमदत व पुनर्वसन
३४प्रकाश आबिटकरसार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण</td>
३५संजय सावकारेवस्त्रोद्योग
३६आकाश फुंडकरकामगार
क्रं.राज्यमंत्रीराज्यमंत्री
माधुरी मिसाळसामाजिक न्याय,अल्पसंख्याक विकास वैद्यकीय शिक्षण
आशिष जयस्वालअर्थ आणि नियोजन आणि विधी व न्याय
इंद्रनील नाईकउच्च आणि तंत्र शिक्षण आणि आदिवासी विकास
मेघना बोर्डीकरसार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण
योगेश कदमगृहराज्य शहर
पंकज भोयरगृह निर्माण

Story img Loader