‘भारत जोडो’ यात्रेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी ब्रिटेनच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी हार्वर्ड आणि केंब्रिज विद्यापीठात संबोधित केलं. तेव्हा राहुल गांधी भाजपावर जोरदार हल्ला केला आहे. संसदेत नोटबंदी, जीएसटी, चीनबाबत बोलण्याची परवानगी दिली जात नाही, असा आरोप राहुल गांधींनी केला होता. आता यावरूनच भाजपा आमदार नितेश राणेंनी राहुल गांधींवर टीकास्र सोडत त्यांची दहशतवाद्यांशी तुलना केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, “राहुल गांधींवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. बाहेर देशांत भारताची बदनामी करून टाळ्या मिळवत आहेत. हे देशद्रोह्यासारखं आहे. म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला टाकला पाहिजे. जेवढा द्वेष पाकिस्तान करतो, तेवढाच राहुल गांधी करत आहेत. पाकिस्तान आणि राहुल गांधींची भाषा एकच असून, त्यांना देशाबाबत बोलण्याचा अधिकार नाही.”
हेही वाचा : हसन मुश्रीफांच्या घरावर ईडीची धाड, देवेंद्र फडणवीसांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाले…
“पाकिस्तान आणि राहुल गांधी…”
“राहुल गांधी ज्या घरात राहतात सुविधा वापरतात ते भारत सरकारच्या आहेत. त्याच भारताची तुम्ही बदनामी करत असाल, तर दाऊद इब्राहिम, ओसामा बिन लादेन आणि राहुल गांधींमध्ये काही फरक नाही. पाकिस्तान आणि राहुल गांधी एकच आहेत,” अशी टीका नितेश राणेंनी केली आहे.
हेही वाचा : “…तर लोकसभेला कसे पराभूत झालात”, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना खोचक टोला
“भारतात लोकशाहीला वाचवण्यासाठी असलेल्या संस्था…”
दरम्यान, भारताबद्दल बोलताना राहुल गांधींनी सांगितलं होतं, “पूर्वी भारत असा नव्हता. त्या भारताचा आम्हाला प्रचंड अभिमान होता. पण, आताचा भारत बदलला आहे. भारतात लोकशाहीला वाचवण्यासाठी असलेल्या संस्था भाजपाने काबीज केल्या आहेत. आरएसएसमुळे केंद्र सरकारला वाटतं, भारत चीनबरोबर लढू शकत नाही. हेच म्हणणं परराष्ट्र मंत्र्यांकडूनही स्पष्ट करण्यात आलं,” असा टोला राहुल गांधींनी भाजपाला लगावला आहे.