राज्यात रविवारी ग्रामपंचायत आणि थेट सरपंचपदासाठी निवडणूक पार पडली. राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायती आणि सरपंचपदासाठी ७४ टक्के मतदान झालं होते. या निवडणुकींचा निकाल समोर आला आहे. त्यानुसार या निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडीने सरशी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. यावर भाजपाचे आमदार नितेश राणेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

“सिंधुदुर्गमध्ये चारमधील तीन ग्रामपंचायतीवर भाजपाने विजय मिळवला आहे. राज्यातही सकारात्मक परिस्थिती असल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तीन महिन्यांच्या कालावधीत घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या जनतेचा सरकारवर विश्वास वाढत आहे. मात्र, गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या निमित्ताने राज्यात पनवती लागली होती,” अशी टीका भाजपा आमदार नितेश राणेंनी केली आहे.

हेही वाचा – अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार : चंद्रकांत पाटील म्हणाले, “आम्ही माघार घेतली नसती तर…”

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाला आवाहन केलं होतं. त्यावर नितेश राणे म्हणाले, “वरिष्ठ पातळीवर तो निर्णय घेतला आहे. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं की राज ठाकरेंच्या पत्राची आम्ही गंभीर दखल घेऊ. त्यानंतर आशिष शेलार, मुरजी पटेल आणि वरिष्ठांशी फडणवीसांनी चर्चा केली असेल. त्यानुसार अंधेरी-पूर्व पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय झाला,” असेही राणेंनी म्हटलं.

Story img Loader