राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून आजचा दिवस चांगलाच वादळी राहिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेला उत्तर देताना आज विधानसभेत आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना त्यांच्या खात्याचे निर्णय वरुण सरदेसाई घ्यायचे, असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा – विनायक मेटेंचा अपघात नेमका कशामुळं? फडणवीस म्हणाले, “ड्रायव्हरनं….”

एकनाथ शिंदे हे त्यांच्या विचारांवर ठाम होते, म्हणून आज हिंदुत्त्वाचं सरकार अस्थितत्वात आहे. गेल्या वेळी नगरविकासमंत्री असताना त्यांना मनासारखे निर्णय घेता येत नव्हते. कला नगरमधून फाईल यायच्या आणि एकना शिंदे यांच्यावर सही करण्यासाठी दबाव आणला जायचा, असा गंभीर आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.

हेही वाचा – OBC Reservation in Maharashtra: शिंदे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; म्हणाले, “पुढील पाच आठवडे…”

पुढे ते म्हणाले, ”नगरविकास खात्याचे निर्णय वरुण सरदेसाई नावाचा व्यक्ती घेत होता. त्याला सुरक्षा का देण्यात आली होती. सरकारच्या बैठकीत तो का बसायचा?” असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला. तसेच वरुण सरदेसाईंच्या दबावाखाली एकनाथ शिंदे यांना निर्णय घ्यायला लागायचे, असेही ते म्हणाले.