छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते. ते स्वराज्यरक्षक होते, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. पवारांच्या याच विधानाचा भाजपा आणि शिंदे गटाने विरोध केला आहे. अजित पवार यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी केले आहे. त्यानंतर आता भाजपाचे नेते नितेश राणे यांनीदेखील अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार यांचा धरणवीर असा उल्लेख करत नितेश राणे यांनी अजित पवार यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

हेही वाचा >> ‘अजित पवार २४ तासांत माफी मागा,’ तुषार भोसलेंच्या मागणीवर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया; म्हणाले, “जागा अन् वेळ…”

ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”
raj Rajshekhar emotional letter written to grandfather Rajshekhar
“प्रिय आजोबा…”, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर यांच्या नातवाने लिहिलं भावुक पत्र, म्हणाला…
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !
What Ajit Pawar Said About Nawab Malik?
Ajit Pawar : “नवाब मलिकांना ३५ वर्षे ओळखतो ते दाऊदची साथ…”; अजित पवार नेमकं काय म्हणाले?

“आम्ही हिंदवी स्वराज्यरक्षक धर्मवीर संभाजी महाराजांना धर्मवीरच म्हणणार. धरणवीर असणाऱ्यांना धर्मवीर ही पदवी कधीच कळणार नाही. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिले. इस्लामसमोर न झुकता औरंगजेबाला आपली जागा दाखवली. त्यांनी हिंदू धर्माचे वेगवेगळे ग्रंथ लिहिले. हे राष्ट्रवादी आणि पवारांना कधीच समजणार नाही,” अशी टीका नितेश राणे यांनी केली.

हेही वाचा >> अब्दुल सत्तारांच्या स्वपक्षीय नेत्यांवर आरोप, रोख नेमका कोणाकडे? संदिपान भुमरे म्हणाले “याबाबत…”

“महाराष्ट्राच्या विरोधीपक्षपदावर ठपका लागला आहे. त्यामुळे जास्त वेळ न घालवता थोडीजरी लाज राहिली असेल तर अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,” अशी मागणीही नितेश राणे यांनी केली.

हेही वाचा >> “सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजीराजे हे स्त्रीलंपट…”, जितेंद्र आव्हाडांचं खळबळजनक ट्वीट

अजित पवार काय म्हणाले?

विधानसभेत बोलत असताना अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी भाष्य केले होते. “महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही. बाल शौर्य पुस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर… धर्मवीर… उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा”, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली होती.