‘संभाजी महाराज धर्मवीर नव्हते’ या अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात भाजपा आणि शिंदे गटाने आक्षेप व्यक्त केला. याच मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून भाजपाचे नेते नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अजित पवार यांच्या विधानानंतर त्यांनी कणकवली येथे वाहनांवर ‘धर्मवीर संभाजी महाराज’ असे लिहिलेले स्टिकर्स लावण्याची मोहीम हाती घेतली होती. हाच मुद्दा घेऊन ते राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यावरही टीका करत आहेत. त्यांनी बुधवारी (११ जानेवारी) वर्धा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना अमोल कोल्हे यांचा एकेरी उल्लेख केला. तसेच आक्षेपार्ह शब्दांत टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> “भारतातील ‘ही’ दोन खोकल्याची औषधं लहान मुलांना देऊ नका”, १९ मृत्यूनंतर जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

“तो कुठलातरी अमोल कोल्हे पैसे घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो. त्याला सिरियसलसाठी पैसे दिले जातात. तो फक्त नावासाठी निवडून आलेला आहे. त्याला २०२४ साली पराभूत करून टाकू. दाढी काढल्यावर त्याला कोणी ओळखणार पण नाही. तो फक्त सिरियल पुरताच आहे,” अशी टीका नितेश राणे यांनी केली.

हेही वाचा >> पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट, रुग्णालयात जाऊन केली प्रकृतीची विचारपूस

“पेपरवर कोणीतरी काहीतरी लिहून देतो आणि आमचे अजित पवार तेच वाचून दाखवतात. तुम्ही काय वाचताय? वर्षानुवर्षे संभाजी महाराजांनी जी उपाधी लावलेली आहे, ती तुम्हाला अमोल कोल्हेमुळे लगेच पुसून टाकायची आहे का?” अशा शब्दांत नितेश राणे यांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली.

अमोल कोल्हेंच्या सिरीयलसाठी हा वाद

दरम्यान, याआधी नितेश राणे यांनी अमोल कोल्हे यांची सिरीयल चालावी म्हणूनच संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक असा वाद निर्माण करण्यात आला, असा दावा केला होता. “मागील अनेक पिढ्यांपासून आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीरच म्हणतो. आमच्या अगोदरच्या पिढीनेही त्यांना धर्मवीरच म्हटलेलं आहे. येणाऱ्या पिढीसाठीही संभाजी महाराज यांची धर्मवीर अशीच ओळख असेल. आता कोणीतरी उठतं. आपली सिरियल चालावी म्हणून ते नवनवीन गोष्टी आणतात. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच होते,” असेही नितेश राणे म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitesh rane criticizes amol kolhe on sambhaji maharaj dharmaveer controversy prd