दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने ४४ वेळा फोन आले होते. या ‘एयू’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा होतो, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी काल लोकसभेत केला होता. यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपाचे नेते नितेश राणे यांहीही आता या प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आदित्य ठाकरेंनी नार्को चाचणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

हेही वाचा – सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण: आदित्य ठाकरेंवरील आरोप लोकसभा कामकाजातून वगळले, शेवाळेंनी नेमके काय आरोप केले?

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Peoples representatives do not want helmets then why police insisting Jan Manch organization Question
लोकप्रतिनिधींना हेल्मेट नको, मग पोलिसांचाच आग्रह का? जनमंचचे राजीव जगताप म्हणतात, ‘पायी चालणाऱ्यांनाही…’
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाबाबत आदित्य ठाकरेंची मोठी मागणी; म्हणाले, “सर्व विवादित भाग…”
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

“काल राहुल शेवाळे यांनी लोकसभेत सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियानच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. हेच राहुल शेवाळे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये होते. उद्धव ठाकरेंचे लाडके होते. जेव्हा त्यांच्याच किचन कॅबिनेटमधील एक खासदार बाहेर येऊन सांगतो आहे, की रिया चक्रवर्ती आणि सुशांतसिंहमध्ये ४४ कॉल झाले. त्यांच्यात AU म्हणजे आदित्य ठाकरे आहे, तर याची चौकशी झाली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली.

हेही वाचा – “याबाबत मी कधीच…”, आदित्य ठाकरेंवरील आरोपांवर सुप्रिया सुळेंचं टीकास्र; म्हणाल्या, “गलिच्छ..!”

“आतापर्यंत आम्ही जे बोलत होतो, त्यापेक्षाही महत्त्वाची भूमिका राहुल शेवाळे यांनी घेतली आहे. A फॉर आफताब आणि A फॉर आदित्य, सगळ्या विकृतीचे नाव एकसमान झालं आहे. आजही दिसा सानियानच्या मृत्यूची केस मुंबई पोलिसांकडे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी, नेमकं ८ आणि ९ जूनच्या रात्री काय झालं? कशामुळे सुशांतसिंहची हत्या करण्यात आली. रिया चक्रवर्तीची या प्रकरणात काय भूमिका आहे? या प्रकणात तपास अधिकारी दोनदा का बदलले गेले? या सर्व गोष्टी उजेडात येणं गरजेचे आहे, त्यामुळे आदित्य ठाकरेंची नार्कोटेस्ट करावी”, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा – “शेवाळेंनी केलेल्या आरोपांना शुद्ध मराठीत…”, संजय राऊतांचं टीकास्र; CBI चाही केला उल्लेख!

“जेव्हा दिशा सालियानच्या आणि सुशांतसिंह राजपूतच्या मुत्यूचा विषय येतो, तेव्हा केवळ आदित्य ठाकरेंचं नाव पुढे का येतं? दुसऱ्या कोणत्याही राजकीय नेत्याचे नावं येत नाही. याचाच अर्थ काही तरी गडबड आहे. एकाच माणसाचं सातत्याने नाव घेतलं जातं, आजपर्यंत माझ्यासह जे कोणी या विषयावर बोलले, त्यांनी आदित्य ठाकरेंच नाव घेतलं आहे, एवढंच नाही, तर सुशांतसिंगचे फॅन्सदेखील या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत आहे”, असेही ते म्हणाले.

Story img Loader