Nitesh Rane : महाराष्ट्रातील मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे जे राज ठाकरेंबाबत म्हणत आहेत त्याला रश्मी ठाकरे यांची मान्यता आहे का? असा बोचरा प्रश्न नितेश राणेंनी विचारला आहे. तसंच नितेश राणेंनी मी गोमूत्र पितो ते आरोग्यासाठी चांगलं असतं असं म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे नितेश राणेंनी?

३९ वर्षे माझे वडील बाळासाहेब ठाकरेंसह होते. आम्ही होतो. उद्धव ठाकरेंनी आमच्याबरोबर वाईट राजकारण केलं नसतं तर आम्ही गर्वाने म्हटलं असतं की आम्ही शिवसैनिक आहोत. माझ्या वडिलांनी हिंदुत्वासाठी जे केलं आहे ते मी एखाद्या पॉडकास्टमध्ये बोलू शकत नाही. तसंच उद्धव ठाकरे हे सध्या राज ठाकरेंबरोबर एकत्र येण्याबाबत बोलत आहेत. पण हे रश्मी वहिनींना त्यांनी विचारलं आहे का? या दोघांनी एकत्र यायला त्यांची मान्यता आहे का? असा खोचक प्रश्न नितेश राणेंनी विचारला.

मी गोमूत्र पितो ते आरोग्यासाठी चांगलं असतं-नितेश राणे

तुम्ही रुह अफजा पिता का? असा प्रश्न नितेश राणेंना पॉडकास्टमध्ये विचारण्यात आला त्यावर ते चटकन म्हणाले, मी रुह अफजा वगैरे पित नाही. रुह अफजा देणारा माणूस कोण त्यावर ते अवलंबून आहे. रुह अफजा मला कुणीही चांगल्या भावनेने देणार नाही. तुम्ही विचार करा रुह अफजा नितेश राणेला कोण देईल? रुह अफजा फार गोड असतं ते मला आवडतही नाही. मी गोमूत्र पितो, आज मी तुम्हाला सांगतो की ते आरोग्यासाठी फार चांगलं असतं असं नितेश राणेंनी म्हटलं आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या पॉडकास्टमध्ये नितेश राणेंनी दिलं आहे.

उद्धव ठाकरे जिहाद हृदयसम्राट-नितेश राणे

उद्धव ठाकरेंच्या विरोधात तुम्ही एका शब्दात टीका करायची असेल तर तुम्ही कुठला शब्द वापराल असं विचारलं असता नितेश राणे म्हणाले मी त्यांना हिंदू विरोधी म्हणेन किंवा जिहाद हृदय सम्राट म्हणेन. महाराष्ट्रात खरी टक्कर कुणाशी आहे शरद पवार की आदित्य ठाकरे यांच्याशी आहे? असं विचारलं असता शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत. आदित्य ठाकरे आत्ता राजकारणात आले आहेत त्यामुळे यापैकी कुणी नाही असं म्हटलं आहे. नेते नसता तर काय असता तर वकील असता असं विचारलं असता ते म्हणाले मी नेते नसतो तर वकील असतो असं नितेश राणे म्हणाले. मी गोमूत्र भरपूर पितो कारण ते आरोग्यासाठी चांगलं असतं असं नितेश राणेंनी म्हटलं आहे. ३९ वर्षे आम्ही (राणे कुटुंब) बाळासाहेब ठाकरेंबरोबर होतो. उद्धव ठाकरेंनी घाणेरडं राजकारण केलं. आम्ही लहानपणापासून बाळासाहेब ठाकरेंनाच मानत आलो आहोत. १२ वर्षे आम्ही काँग्रेसमध्ये होतो तेव्हाही आमच्या रक्ताचा रंग भगवाच होतो. तसंच भाजपात आल्यानंतर आमच्या रक्ताचा रंग भगवाच आहे असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.