शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे आज राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’मध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेना नेते, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर तसेच इतर अनेक सहकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. मात्र आदित्य ठाकरे या यात्रेमध्ये सहभागी होण्यासंदर्भात नितेश राणेंना प्रश्न विचारला असता त्यांनी राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली. याचबरोबर नितेश राणेंनी अफजल खानाच्या कबरीजवळचं बेकायदेशीर बांधकाम काढल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.

साताऱ्यातील किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथील अफजलखान कबरीचे मूळ ऐतिहासिक बांधकाम वगळून उर्वरित बेकायदा बांधकाम गुरुवारी पहाटे मोठ्या पोलीस बंदोबस्तात हटविण्यास सुरुवात करण्यात आली. राज्य सरकारने गोपनीयता राखत शिवप्रताप दिनी ही कारवाई केली. या कारवाईबद्दल बोलताना नितेश राणेंनी ‘मुंबई तक’शी बोलताना समाधान व्यक्त केलं. “सर्व हिंदूत्ववादी संघटनांची ही जुनी मागणी होती. अफजल खानच्या कबरीच्या आजूबाजूचं बेकायदेशीर बांधकाम हटवण्याची आमची मागणी होती. ते बेकायदेशीर होतं. हळूहळू सर्व जागा ताब्यात घेण्याचा तिथे प्रयत्न सुरु होता. दुपारी तुम्ही तिथे गेलात तर ते खान साहेब झोपले आहे असं सांगून परवानगी नाकारली जायची. असं करुन संपूर्ण जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होता. कोणी

दरम्यान, आज दुपारी भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी नांदेड जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर प्रथम पार्डी मक्ता येथील राहुल गांधी यांच्या कँपवर पोहोचले. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. दोघांचे या यात्रेमधील एकत्र चालतानाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. मात्र आदित्य ठाकरे या यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याचं समजल्यानंतर पत्रकारांनी नितेश राणेंना प्रश्न विचारला. या प्रश्नावरुन नितेश राणेंनी दोघांनाही ‘पप्पू’ म्हटलं. त्यांचं उत्तर ऐकून उपस्थित सर्वच कार्यकर्ते हसू लागले.

“भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये आहे. आज आदित्य ठाकरे या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. याबद्दल काय सांगाल?” असा प्रश्न पत्रकाराने नितेश राणेंना विचारला. त्या प्रश्नावर नितेश राणेंनी, “दोन पप्पू भेटत असतील तर मी त्यावर काय बोलणार?” असा प्रतिप्रश्न हसत विचारला.

Story img Loader