राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी धमकी दिल्याचा आरोप करत एका व्यक्तीने चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर भाजपा नेते नितेश राणे यांनी छगन भुजबळ यांना खोचक टोला लगावला. आता तर भुजळांना सरस्वती देवीही वाचवू शकणार नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा – छगन भुजबळांविरोधात गुन्हा दाखल, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप; सरस्वती वक्तव्याशी आहे संबंध

“हे हिंदुत्त्वाचे सरकार आहे, लक्षात ठेवा”

“चेंबूरमधील व्यावसायिकाने सरस्वतीचा राग करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता तर आई सरस्वती देदेखील त्यांना वाचवू शकत नाही. हे हिंदुत्त्वाचे सरकार आहे. हे त्यांनी आता लक्षात ठेवावं”, असे ट्वीट नितेश राणेंनी केले आहे.

काय आहे प्रकरण?

चेंबूरमध्ये राहणारे व्यावसायिक ललितचंद टेकचंदानी यांच्या तक्रारीनंतर छगन भुजबळ आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोन आणि मेसेजद्वारे धमकावल्याचा आरोप टेकचंदानी यांनी केला आहे.

छगन भुजबळांचा सरस्वती बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे दोन व्हिडिओ शेअर केल्यामुळे मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, असेही टेकचंदानी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Story img Loader