मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत विरोधकांवर जोरदार टीका केली. औरंगाबाद शिवसेनेच्या ३७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित स्वाभिमान सभेत ते बोलत होते. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या सभेत ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून भाजपला लक्ष्य केले. भाजपाच्या प्रवक्त्यांमुळे जगात देशाची बदनामी झाली. दुसरीकडे, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था संकटात असून, लोक महागाईत होरपळत आहेत. त्यामुळे कुठे नेऊन ठेवणार देश माझा, असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली सोडले. उद्धव ठाकरेंच्या सभेतनंतर विरोधकांकडून त्यांना उत्तर दिले जात आहे.

भाजपा आमदार नितेश राणे यांनी एक फोटो ट्विट करत या सभेवरुन मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. या फोटोमध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे काही लोकांना पैसे देत असल्याचे दिसत आहे. विराट सभेचा फॉर्म्युला? असे कॅप्शनही नितेश राणे यांनी या फोटोला दिले आहे. मात्र याबाबत आता चंद्रकांत खैरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

हिंदूत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालतो? : उद्धव ठाकरे

“नितेश राणेंच्या विरोधात मी पोलिसांत गुन्हा दाखल करणार आहे. नितेश राणे माझ्यापेक्षा खूपच लहान आहे. कोणत्या वेळी जुने फोटो काढायचे हे त्यांना समजत नाही. मी काल कोणते कपडे घातले होते आणि त्यावेळेस कोणते कपडे घातले होते याचे पुरावे आहेत. भाजपाचे फालतू लोक हे जे काही करत आहे त्याविरोधात आमचे कार्यकर्ते पोलीस आयुक्तांकडे जाणार आहेत,” असे चंद्रकांत खैरे यांनी एबीपी माझासोबत बोलताना सांगितले.

औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर कधी होणार? जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंचं सूचक विधान

“हा जुना कुठला तरी फोटो असेल. जुना फोटो दाखवणे हा तर बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. मी त्यांच्या बापाच्या बरोबरचा आहे हे नितेश राणेंना समजत नाही का? काल उद्धव ठाकरेंनी स्वतः कोणी भाडोत्री लोक आहेत का असे विचारले. तेव्हा लोकांनी नाही असे सांगितले. ते तुम्ही दाखवा ना. नितेश राणेंनी १६ पेट्रोल पंप कुठून आणले हे सगळे मला माहिती आहे. मी जुना शिवसैनिक आहे,” असेही चंद्रकांत खैरे म्हणाले. फोटो टाकणाऱ्यांनी पुरावे द्यावेत. माझी बदनामी करण्यात येत असल्याने मी कारवाई करणार आहे, असे खैरे म्हणाले.

Story img Loader