लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

अलिबाग: कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईज ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालकांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. ८ ऑगस्टला सकाळी १० वाजेपर्यंत खालापूर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी २ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईज ग्रुपच्या तक्रार नोंदवली होती. यानंतर ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईज ग्रुपच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा-“त्यांचा कुणालाही फसवण्याचा हेतू नव्हता”, नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर मुलगी मानसीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “चुकीची माहिती…”

खालापूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील ९ जणांचे एक पथक तपासकामी नियुक्त करण्यात आले आहे. यात एक पोलीस निरीक्षक, ३ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि ४ पोलीस अमंलदारांचा समावेश आहे.

गुन्ह्याच्या अनुषंगाने १५ साक्षीदारांचे जाबाब नोंदविण्यात आले आहेत. तर ईसीएल फायनान्स कंपनी, एडलवाईज ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस बजावली आहे. त्याच बरोबर एनडी स्टुडिओचे कायदेशीर सल्लागार, आर्थिक सल्लागार आणि अकाऊटंट यांचेकडून कर्ज प्रकरणांबाबतची माहिती संकलित करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

Story img Loader