म्हाडा वसाहतीतील कार्यालयावरून भाजपा आमदार नितेश राणेंनी शिवसेना आमदार अनिल परब यांच्यावर टीकास्त्र डागलं होतं. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली होती. उद्धव ठाकरेंच्या हिंमत नाही. उद्धव ठाकरे हे ना*** आहेत, असं नितेश राणेंनी म्हटलं होतं. याला आता शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“नारायण राणे आणि नितेश राणेंचा चेहरा पाहिला तरी महाराष्ट्रायीन सोडा हिंदुस्थानीही वाटत नाही. वारंवार चुकीच्या पद्धतीने बोलत असतात. नितेश राणे स्वत:लाच साहेब म्हणतात. हे भाजपाचे तळवे चाटत आहेत. काँग्रेसमध्ये तळवे चाटून महसुलमंत्रीपद मिळवलं. आता तळवे चाटल्याने केंद्रात मंत्री केलं,” अशी टीका नितीन देशमुखांनी केली आहे.

हेही वाचा : “चमचाभर हलवासुद्धा मुंबईच्या…”, अर्थसंकल्पावरून संजय राऊतांचं भाजपावर टीकास्त्र!

नितेश राणे काय म्हणाले होते?

अनिल परबांवर हल्लाबोल करताना नितेश राणे म्हणाले, “दुसऱ्यांची घरं पाडण्याची तक्रारी देणाऱ्या लोकांबरोबर कधीतरी नियती खेळ करत असतेच. आमचं, कंगणाचं घर तोडलं. कधी कोणाला अट केली. अनिल परब हे ‘मातोश्री’चे कारकून आहे. उद्धव ठाकरेंच्या हिंमत नाही. उद्धव ठाकरे हे ना*** आहेत. त्यांना अनिल परबांसारखे कारकून लागतात. त्यामुळे अनिल परबांचं घर झाकी है ‘मातोश्री’ २ बाकी है. ‘मातोश्री’-२ मध्ये कोणत्याही शिवसैनिक आणि शिल्लक सेनेच्या नेत्याला प्रवेश नाही,” असा टोला नितेश राणेंनी लगावला.

हेही वाचा : “निवडणुकीची वेळ मारून नेण्यासाठी देशवासीयांना गुंगीचे औषध…”, अर्थसंकल्पावरून शिवसेनेचं भाजपावर टीकास्त्र!

“आमचं सरकार आल्यापासून महाराष्ट्राचं राजकारण सुरुळीत आहे. हिंदूत्ववादी विचाराचं सरकार महाराष्ट्रात आलं आहे. महाराष्ट्राला कोणीही वाकड्या नजरेने पाहणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ,” असं नितेश राणेंनी सांगितलं होतं.