तळागाळापर्यंत लोकशाही पोहचविण्याच्या नावाखाली आम आदमी पक्ष(आप) देशाच्या लोकशाही चौकटीलाच आव्हान देत असून, हा ‘उजवा माओवाद’ असल्याची टीका भाजप नेते नितीन गडकरी यांनी केली आहे. विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या औचित्यावर गडकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
“दिल्लीमध्ये सरकार स्थापण्याच्या नावावर अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ने तमाशा सुरू केला आहे. सरकार स्थापण्यासाठी जनतेचा कौल घेण्याचा केजरीवाल यांचा निर्णय अतिरेकी असून याला ‘उजवा माओवाद’च म्हणावे लागेल,” अशी टीका गडकरी यांनी केली.
आगामी लोकसभा निवडणूक १०१ टक्के नागपूरमधून लढवणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
‘आप’म्हणजे उजवा माओवाद – नितीन गडकरी
तळागाळापर्यंत लोकशाही पोहचविण्याच्या नावाखाली आम आदमी पक्ष(आप) देशाच्या लोकशाही चौकटीलाच आव्हान देत असून

First published on: 18-12-2013 at 02:11 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari calls aam aadmi party right wing maoism