तळागाळापर्यंत लोकशाही पोहचविण्याच्या नावाखाली आम आदमी पक्ष(आप) देशाच्या लोकशाही चौकटीलाच आव्हान देत असून, हा ‘उजवा माओवाद’ असल्याची टीका भाजप नेते नितीन गडकरी  यांनी केली आहे. विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या औचित्यावर गडकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
“दिल्लीमध्ये सरकार स्थापण्याच्या नावावर अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ने तमाशा सुरू केला आहे. सरकार स्थापण्यासाठी जनतेचा कौल घेण्याचा केजरीवाल यांचा निर्णय अतिरेकी असून याला ‘उजवा माओवाद’च म्हणावे लागेल,” अशी टीका गडकरी यांनी केली.
आगामी लोकसभा निवडणूक १०१ टक्के नागपूरमधून लढवणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा