राज्यातील मान्यवर नेत्यांच्या धुळवडीत भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही रंग उधळल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या पक्षस्थापना दिनानिमित्ताने येथे शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची तुलना चक्क माकडाशी केली.
या कार्यक्रमात त्यांनी एक एसएमएस वाचून दाखविला. ‘‘स्वर्गात गांधीजींनी एकदा चित्रगुप्ताला विचारले, की आपल्या तीन माकडांचे सध्या पृथ्वीवर कसे चालले आहे? तेव्हा चित्रगुप्त म्हणाला, की डोळ्यांवर हात ठेवलेले माकड म्हणजे देशातील आंधळा कायदा आहे. तोंडावर हात ठेवलेले माकड म्हणजे मनमोहन सिंग आहे. ते काहीच बोलत नाहीत आणि तिसरे कानावर हात ठेवलेले माकड म्हणजे यूपीए सरकार आहे.’’

Story img Loader