भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने १९५ नावांची यादी जाहीर केली आहे. या यादीत नितीन गडकरी यांचं नाव नाही. त्यावरुन आता उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला आहे. मी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची नावंही ऐकली नव्हती, तेव्हापासून गडकरींचं नाव ऐकतोय. पण त्यांना पहिल्या यादीत स्थान नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
सध्याच्या सरकारवर सगळेच नाराज झाले आहेत. अंधभक्तांना मी यात धरत नाहीत. ईव्हीएमच्या मदतीने हे जिंकले तर देशात मोठा असंतोष होईल. जनता हा लोकशाहीतला मोठा घटक आहे. जनतेच्या मनाविरुद्ध गोष्टी घडू शकतं. ईव्हीएम घोटाळा करुन जिंकले तर देशात असंतोष माजेल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
मोदी शाह ही नावं ऐकली नव्हती तेव्हापासून मी गडकरींना ओळखतोय
भाजपाने १९५ जणांची यादी जाहीर केली. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं, मोदी, अमित शाह यांची नावंही मी ऐकली नव्हती. तेव्हापासून नितीन गडकरींचं नाव मी ऐकत आलो आहे. बाळासाहेब ठाकरेंचं मुंबई पुणे रस्त्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. अशा माणसाचं नाव पहिल्या यादीत नाही. तर बेहिशेबी मालमत्ता जमवणाऱ्या कृपाशंकर सिंह यांचं नाव पहिल्या यादीत आहे. ही आजची भाजपा आहे. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टोला लगावला. ईव्हीएमचा घोटाळा करुन भाजपा जिंकली तर आश्चर्य वाटायला नको. मात्र लोकांमध्ये असंतोष निर्माण होईल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
सुषमा अंधारेंना मी सांगितलं होतं की चालत फिरु नका. तितक्यात सुषमा अंधारे म्हणाल्या की वेळप्रसंगी आम्ही झोपड्याही उभारल्या. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले त्या काढल्या ना? नाही तर त्या झोपड्या म्हणजे पंतप्रधान आवास योजनेतली घरं म्हणून जाहीर करतील असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.