”वेळ ही अत्यंत महत्त्वाची असून विकासकामांबाबत सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच मोठी समस्या आहे”, असे वक्तव्य करत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एकप्रकारे मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ते नॅशनल कंव्हेशन ऑफ सिव्हिल इंजिनीअर्स ( NATCON 2022 ) या कार्यक्रमात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – “देवेंद्र फडणवीस भाजपा-सेना युतीचे मुख्यमंत्री होणार,” चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान

नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?

मुंबईत नॅटकॉन २०२२ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला. ”बांधकाम क्षेत्रात वेळेला खूप महत्त्व आहे. वेळ हीच आपली खरी संपत्ती आहे. मात्र, सरकारची सर्वात मोठी समस्या ही आहे, की सरकार वेळेवर निर्णय घेत नाही”, असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले.

हेही वाचा – ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरात काँग्रेसचं ‘आरे वाचवा’ आंदोलन, २० ते २५ कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात”

”भारतात बांधकाम क्षेत्राचे भविष्य उज्वल आहे. मात्र, त्यासाठी आपल्याला जगातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल. आपल्याकडे बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या मेटरीयलला सुद्धा पर्याय शोधावे लागतील. जेणेकरून प्रकल्पाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता, त्याची किंमत कमी करत येईल. कोणतेही प्रकल्पासाठी त्यांची गुणवत्ता, त्याची किंमत आणि त्याला लागणारा वेळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो, असेही ते म्हणाले.