राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपाने संयुक्तपणे राज्यात सत्ता स्थापन केली आहे. सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी घेतली आहे. या सत्ताबदलानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एकनाथ शंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे काम आणि राज्याच्या प्रगतीवर भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे यांना असं अमृत पाजलं आहे की, मला वाटतंय राज्याच्या विकासाची यात्रा बुलेट ट्रेनपेक्षाही वेगने पुढे जाईल, असे गडकरी म्हणाले आहेत. मुंबईत आयोजित केलेल्या आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित केलेल्या संकल्प ते सिध्दी (नवा भारत, नवे संकल्प) परिषदेत बोलत होते.
हेही वाचा >>> Shinzo Abe Death : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या; पाच तास मृत्यूशी अयशस्वी झुंज
“एकनाथ शिंदे आणि देवेंद्र पडणवीस यांचा आज हा पहिलाच कार्यक्रम होता. आम्ही त्यांना असं अमृत पाजलं आहे, की मला वाटतंय त्यांची गाडी आता थांबणार नाही. आता महाराष्ट्राच्या विकासाची यात्रा बुलेट ट्रेनपेक्षा जास्त वेगाने पुढे जाईल,” असे गडकरी म्हणाले आहेत. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
हेही वाचा >>> शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी केली मोठी मागणी, म्हणाले ‘… तर आम्ही घरी बसू’
कार्यक्रमात पुढे बोलताना,केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन आहे. देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राने कायमच देशाच्या आर्थिक विकासात महत्वाचे योगदान दिले आहे. सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रात महाराष्ट्राने उत्कृष्ट काम केले असून महाराष्ट्रात येणाऱ्या काळात बांधण्यात येणारे रस्ते, रोप वे यामुळे अधिकच्या पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे.”
हेही वाचा >>> शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह खरंच जाणार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “कोणीही…”
“महाराष्ट्र राज्य रस्ते व विकास महामंडळामार्फत बांधण्यात आलेला मुंबई पुणे एक्स्प्रेस वे असेल किंवा या महामंडळामार्फत महाराष्ट्रात बांधण्यात आलेले वेगवेगळे उड्डाणपूल असोत; यामुळे महाराष्ट्राला एक वेगळी गती मिळाली आहे. महाराष्ट्रात बांधण्यात आलेला समृध्दी महामार्ग हा महत्वपूर्ण ठरणार असून येणाऱ्या काळात वेगवेगळे रस्ते बांधून संपूर्ण देशात रोड कनेटिव्हिटीचे जाळे निर्माण केले जाणार आहे. राज्यात सध्या पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने येणाऱ्या काळात इथेनॉल निर्मिती आणि इथेनॉलचा वापर करण्यावर भर यावर आपण लक्ष देणे गरजचे आहे. साखर उद्योगाचे महाराष्ट्रात मोठे योगदान आहे. इथेनॉलला येणाऱ्या काळात पेट्रोलच्या समान पातळीवरील ऊर्जाउत्पादक मूल्याचे इंधन म्हणून प्रोत्साहन देणे गरजेचे आहे,” असेही गडकरी यावेळी म्हणाले.