रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या निवळी येथील उड्डाणपूल रद्द व्हावा, या मागणीसाठी निवळी आणि हातखंबा या दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. हा पूल रद्द करून जमिनीवरूनच महामार्ग तयार करण्यात यावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते पिंट्या निवळकर यांनी यावेळी दिला.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या निवळी येथील रस्त्याचे काम गतीने सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून निवळी बाजारपेठ परिसरातून जाणाऱ्या या मार्गाच्या ठिकाणी उड्डाणपूलाचा प्रस्ताव महामार्ग प्राधिकरणाकडे तयार करण्यात आला आहे. मात्र, येथील बाजारपेठेचा विचार करता महामार्गाचा रस्ता जमिनीवरूनच केला जावा. त्यासाठी उड्डाणपूलाचा केलेला प्रस्ताव रद्द करावा, अशी आग्रही मागणी सुरूवातीपासून येथील ग्रामस्थ, व्यापारी संघटना यांनी केलेली आहे.

आणखी वाचा-Puja Khedkar : पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता, दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज

याबाबत बांधकाम विभाग, खासदार नारायण राणे, आमदार नीलेश राणे यांनाही निवेदन या पूर्वी देण्यात आले असल्याचे ग्रामस्थांचे नेतृत्व करणारे पिंट्या निवळकर यांनी सांगितले. यावेळी निवळी व्यापारी संघटनचे अध्यक्ष संतोष पाध्ये यांच्यासह व्यापारी, व्यवसायिक, ग्रामस्थ तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

Story img Loader