वाई: महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना विद्युत वाहन असणे बंधनकारक नाही. इंधनावरील वाहनांवर कोणतीही बंदी घातलेली नाही असे महाबळेश्वर गिरीस्थान पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी भोरे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाबळेश्वर पाचगणी येथे पर्यटक इंधनावरील वाहने घेऊन येतील. मात्र त्यांना  त्यांची वाहने हॉटेल,पालिका व खाजगी वाहनतळावर उभी करून  फक्त विद्युत वाहन वाहनाचा वापर करूनच मधूनच पर्यटनाचा आनंद घ्यावा लागणार आहे.जर स्वतःचे विद्युत वाहन असेल तर  त्यांना पर्यटनाचा आनंद घेता येईल.येथे पर्यटकांच्या इंधनावरील  खासगी वाहनावर बंदी येणार आहे यापुढे पर्यटकांना  निसर्गाचा आनंद घेण्यासाठी फक्त विद्युत गाडीचा वापर करावा लागेल

तसा प्रस्ताव या दोन्ही पालिकांनी  तयार करून तो अंतिम मंजुरीसाठी पर्यटन मंत्रालयात पोहोचला आहे अशा बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्यावर पर्यटक,हॉटेल व्यवसायिक,स्थानीक टँक्सी मोटार चालक मालक संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.यामुळे या निर्णयाचा पर्यटनावर मोठा परिणाम होईल अशा तक्रारी पालिकेकडे करण्यात आल्या.

महाबळेश्वर, पाचगणी येथे येणाऱ्या शेकडो इंधनावरील वाहनांमुळे वाहतूक कोंडी तर होतेच परंतु यामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे निसर्गाला धोका निर्माण झाला आहे यामुळे पर्यटन विभागाने नाराजी व्यक्त करत येथील निसर्ग वाचविण्याच्या प्राधान्य देण्याच्या सूचना पालिकेला दिल्या आहेत. यामुळे पालिका स्तरावर विद्युत वाहनाचा पर्याय दिल्याचा निर्णय होण्याची शक्यता असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने पर्यटक व इतरांनी या बाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे विविध समाज माध्यमे व वृत्तपत्रात प्रसिध्द झालेले पर्यटकांना विद्युत वाहन आवश्यक हे वृत्त निराधार असल्याची माहिती  महाबळेश्वर गिरीस्थान पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना विद्युत वाहन असणे बंधनकारक  नाही.इंधनावरील वाहनांवर कोणतीही बंदी घातलेली नाही असेही त्यांनी म्हंटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No ban on fuel vehicles at mahabaleshwar pachgani pallavi patil zws