POP Ganesh Idol Ban: महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने पीओपीच्या गणेश मूर्तींना विरोध केला जात आहे. पर्यावरणप्रेमी व पर्यावरण तज्ज्ञ यासंदर्भात सातत्याने भूमिका मांडताना दिसतात. पीओपीच्या मूर्तींच्या उत्पादनावरच बंदी घालण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून जोर धरू लागली आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या आधी त्यावर मोठी चर्चाही होते. मात्र, अद्याप पीओपीच्या मूर्तींवर बंदी अंमलात येऊ शकलेली नाही. यासंदर्भात आज उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने अशा मूर्तींचा वापर टाळण्याचं आवाहन केलं असून तशा मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत.

काय म्हणाले उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती?

“आम्हाला याची कल्पना आहे की अनेक मंडळांना यासंदर्भात आधीच परवानगी देण्यात आलेली आहे. आता प्रशासनानं संबंधित मंडळांना पीओपीच्या मूर्ती न वापरण्याचं आवाहन करावं. पीओपी मूर्तींवरील बंदीबाबतच्या नियमावलींबाबत सविस्तर प्रक्रियेनुसार निर्णय घेतला जाईल. या मुद्द्याशी संबंधित सर्वांनी यासंदर्भात ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रतिज्ञापत्रे सादर करावीत”, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी दिले आहेत.

Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
maharashtra vidhan sabha election 2024 Sanjay Puram vs Rajkumar Puram in Amgaon-Devari constituency
आमगाव-देवरीत संजय पुराम विरुद्ध राजकुमार पुराम सामना; माजी आमदारापुढे माजी सनदी अधिकाऱ्याचे आव्हान
melghat assembly constituency
मेळघाटात दोन माजी आमदारपुत्रांमध्‍ये पुन्‍हा लढाई
Bhool Bhulaiyaa 3 Vs Singham Again Collection
‘सिंघम अगेन’च्या दमदार स्टारकास्टवर एकटा कार्तिक आर्यन पडला भारी! ‘भुलै भुलैया ३’ने नवव्या दिवशी कमावले तब्बल…
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाबाबत काय निर्णय झालाय? शरद पवार सस्पेन्स मिटवत म्हणाले…
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”

नियमावलीचं पालन होत नसल्याबाबत नाराजी

दरम्यान, न्यायमूर्ती उपाध्याय यांनी पीओपी मूर्तींच्या वापराबाबतच्या नियमावलींचं पालन केलं जात नसल्यावर नाराजी व्यक्त केली. “आमच्यासाठी हा मुद्दा फार विचलित करणारा आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनेही व प्रशासनाच्या दृष्टीनेही. २०२०मध्ये यासंदर्भातली नियमावली जारी करण्यात आली आहे. मात्र, त्याचं अद्याप ठोस स्वरुपात पालन केलं जात नाही”, असं न्यायमूर्ती म्हणाले.

मुंबईत पीओपी मूर्तीवरील बंदीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने, मुंबई महानगर पालिकेची उच्च न्यायालयात माहिती

POP मूर्ती टाळण्यासाठी उपाय कोणते?

नियमावली व निर्देश असूनही पीओपी बंदीची अंमलबजावणी होत नसल्यामुळे त्यासाठी आणखी काही प्रकारे प्रयत्न करण्याचा सल्ला न्यायालयाने यावेळी दिला. “यासंदर्भात काहीतरी जबाबदारी निश्चित होणं गरजेचं आहे. अशी जबाबदारी आर्थिक किंवा आणखी कोणत्या स्वरुपातील दंडाची तरतूद केल्यासच निश्चित होऊ शकेल. अशा प्रकारचा कोणताही दंड नसल्यास पीओपी मूर्ती बनवणाऱ्या उत्पादकांवर नियम पाळण्यासंदर्भात कोणताही दबाव नसेल”, असं न्यायमूर्ती म्हणाले आहेत.