लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापूर : मागील दहा वर्षे भाजपने निवडून आणलेले सोलापूरचे दोन्ही खासदार निष्क्रिय ठरल्यामुळे स्थानिक विकास खुंटल्याचा आरोप सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. परंतु त्यांना विकासाच्या मुद्यावर भाजपला जाब विचारण्याचा नैतिक अधिकार नाही. यापूर्वी ६५ वर्षांत विकास न केलेल्या काँग्रेस नेतृत्वाकडून आता दहा वर्षातील विकास कसा मागितला जातो, असा सवाल या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार, आमदार राम सातपुते यांनी केला आहे.

आणखी वाचा-भाजपचा ‘चारसौ पार’चा नारा म्हणजे संविधान बदलण्याचे कारस्थान, आमदार प्रणिती शिंदे यांचा आरोप

अक्कलकोट तालुक्यात जेऊर व अन्य गावांमध्ये आयोजित प्रचार सभांमध्ये आमदार सातपुते यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडताना विकास कामांचा दावा केला. ते म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात ४० हजार कोटींची रस्त्यांची कामे सुरू आहेत. जलजीवन मिशनच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. रेल्वेस्थानक, विमानतळाचा विकास करण्यात येत आहे, असे सांगत सातपुते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भाजपचे उमेदवार समजून मतदारांनी साथ द्यावी, असे आवाहन केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No development in 65 years how can you ask for ten years of development now mla ram satputes question to congress mrj