ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीत राष्ट्रीय कार्यकर्ता शिबिरात मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी सध्याचं राजकारण आणि सरकार टीकास्त्र सोडलं. कोणत्याही राजकीय पक्षाकडे देशाचं उज्ज्वल भविष्य नाही, असं परखड मत त्यांनी यावेळी मांडलं. “सर्वजण पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा मिळवण्याच्या पाठी पडले आहेत. कोणतंही सरकार स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार समजत असेल. तर जनसंसद शक्तिशाली करा की, सरकार पडेल. देशाला वाचवण्याचा दुसारा रस्ता नाही.”, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला. “काँग्रेस असो की भाजपा कोणत्याही पक्षाकडे देशाचं उज्ज्वल भविष्य नाही. देशात बदल घडवायचा असेल, तर सरकार कोणत्याही पक्षाचं असो त्यावर जनसंसदेच्या माध्यमातून दबाव आणला गेला पाहीजे. २०११ च्या लोकपाल आंदोलनात आम्ही हाच संकल्प घेऊन टिम तयार केली होती. मात्र काही लोकांच्या मनात राजकीय महत्त्वाकांक्षा निर्माण झाली आणि टिम विस्कटली. कोणी मुख्यमंत्री झालं, कोणी राज्यपाल, तर काही जण मंत्री झाले. यामुळे देशाचं नुकसान झालं.”, असा निशाणा अण्णा हजारे यांनी साधला.
“काँग्रेस असो की भाजपा कोणत्याही पक्षाकडे…”; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं टीकास्त्र
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीत राष्ट्रीय कार्यकर्ता शिबिरात मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी सध्याचं राजकारण आणि सरकार टीकास्त्र सोडलं.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-09-2021 at 19:53 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No political party has a bright future for the country say anna hazare rmt