कोयना धरण क्षेत्रातील दमदार पाऊस काहीसा ओसरला असून, कोयना धरणाखालील पाटण व कराड तालुक्यातील पावसाची रिपरिपही मंदावली आहे. १०५.२५ टीएमसी क्षमतेच्या या जलविद्युत प्रकल्पाचा पाणीसाठा ७७.११ टीएमसी म्हणजेच ७३.२६ टक्के झाला आहे. कालपासून पाटण तालुक्यातील तारळी प्रकल्पातून २ हजार क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. दरम्यान, सततच्या पावसाने काही ठिकाणी खरिपाच्या खोळंबलेल्या पेरण्या गतीने सुरू आहेत.
धरणात पावसाळी हंगामाच्या ३९ दिवसांत ४९ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. सध्या धरणात सुमारे १५,४८६ क्युसेक्स पाणी मिसळत आहे. धरणाची सध्याची २,१३७ फूट ११ इंच असून, ही पाणीपातळी २,१४० फुटांवर गेल्यानंतरच उर्वरित पाऊस व त्या वेळच्या पावसाचा जोर यावरच धरणातून पाणी सोडण्याचा विचार केला जाईल. धरणाचा पाणीसाठा तुलनेत समाधानकारक असला, तरी पावसाने ओढ घेतल्याने तूर्तास तरी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात नाही परंतु, १ ऑगस्टपर्यंत धरणाची पाणीपातळी २,१४० फूट नियंत्रित करण्याची शक्यता असल्याचे पाटणचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सांगितले. आज सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत कराड तालुक्यात १.८२ एकूण २११.८ तर पाटण तालुक्यात कोयना धरणक्षेत्रातील नवजा व कोयनानगर वगळता उर्वरित दहा मंडलांमध्ये ३.९ एकूण ४२९.८ मि.मी. पावसाची नोंद आहे.
कोयना धरणातून तूर्तास पाण्याचा विसर्ग नाही
कोयना धरण क्षेत्रातील दमदार पाऊस काहीसा ओसरला असून, कोयना धरणाखालील पाटण व कराड तालुक्यातील पावसाची रिपरिपही मंदावली आहे. १०५.२५ टीएमसी क्षमतेच्या या जलविद्युत प्रकल्पाचा पाणीसाठा ७७.११ टीएमसी म्हणजेच ७३.२६ टक्के झाला आहे. कालपासून पाटण तालुक्यातील तारळी प्रकल्पातून २ हजार क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
First published on: 16-07-2013 at 02:35 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No sign of water release from the koyna dam