महाराष्ट्रात २४ ते ३१ ऑक्टोबरदम्यान १४० गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी १६७ जणांना अटक, तर १४६ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. शहाणे असाल, तर मराठ्यांवर गुन्हे दाखल करू नका. गुन्हे माघारी घ्यावेत. गुन्हे दाखल झाल्यानं सरकारविरूद्ध रोष निर्माण होत आहे, असं जरांगे-पाटलांनी सांगितलं.

माजी मंत्री बच्चू कडू यांनी जरांगे-पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. यानंतर जरांगे-पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “बच्चू कडू मराठा आरक्षणासाठी दोन-तीन नेत्यांच्या विरोधात बोलले आहेत. सर्वात पहिल्यांदा मराठा कुणबी एक असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं. म्हणून बच्चू कडूंना मी व्यासपीठावर बोलावलं. बच्चू कडू राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठ्यांच्या बाजूनं उभे आहेत,” असं जरांगे-पाटील म्हणाले.

The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय

हेही वाचा : “उपमुख्यमंत्र्यांचा आमच्याशी दगाफटका करण्याचा डाव”, जरांगे-पाटलांच्या विधानावर नरेंद्र पाटील खडसावत म्हणाले…

“सरकार ६ कोटी मराठ्यांवर गुन्हे दाखल करणार आहे का? गुन्हे दाखल केल्यानं लोकांमध्ये सरकारविषयी जास्त रोष निर्माण होत आहे. अधिकाऱ्यांनी विनाकारण त्रास दिला, तर न्यायालयामार्फत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. गुन्ह्यांच्या भीतीमुळे आरक्षणाच्या लढ्यापासून मागे हटायचं नाही. हे खोटे गुन्हे आहेत,” असा आरोप जरांगे-पाटलांनी केला.

हेही वाचा : मराठा आरक्षणाप्रश्नी सर्वपक्षीय बैठकीवर संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारनं…”

“न्याय मिळेपर्यंत पाणी पिणार नाही. पुरावे असूनही सरकार मराठ्यांना जाणुनबुजून आरक्षण देत नाही. काही जातींना पुरावे नसताना आरक्षण दिलं. आपल्याला कठोर लढाई लढावी लागणार आहे. होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार राहिल,” असा इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.

Story img Loader