वीज वितरण कंपनीकडून शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवारी वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे शहराच्या अनेक भागांस पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेने कळवले आहे.
बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील पाइपलाइन व गुलमोहोर रस्ता, स्टेशन रस्ता, सारसनगर, विनायकनगर, मुकुंदनगर, केडगाव (सकाळी १० नंतरच्या पाणी वाटप होणाऱ्या भागास) या भागास मंगळवारी पाणीपुरवठा होणार नाही. वीज वितरण कंपनी उन्हाळय़ापूर्वीच्या दुरुस्तीसाठी सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान वीजपुरवठा खंडित करणार आहे. परिणामी, मुळानगर, विळद येथून होणारा उपसा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी वितरणातील टाक्या भरता येणार नाहीत व पुरवठा होणार नाही, असे मनपाने पत्रकात म्हटले आहे.

Story img Loader