महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान या अध्यपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने आमदारांना व्हीप बजावला आहे. यामध्ये शिंदे गटातील आमदारांना देखील व्हीप बजावला आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत व्हिपची अंमलबजावणी होत नाही, असा दावा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

अधिवेशनासाठी आमदार विधानसभेत दाखल

विधानसभा परिषदेच्या २ दिवसीय विशेष अधिवेशनास आजपासून सुरुवात झाली आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसोबतच बहुमत चाचणी या अधिवनेशनात घेण्यात येणार आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपा आणि शिंदे गटाचे आमदार अधिवेशनासाठी विधानसभेत दाखल झाले आहेत.

बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणी शिवसेनेशी आमची युती

हे नवीन सरकार सेना भाजप युतीचे आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेशी आमची युती झाली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणीच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या गटाला चांगलीच चपराक दिली असल्याचा टोला मुनगंटीवार यांनी लगावला. पक्षाचा सच्चा कार्यकर्ता कसा असतो, स्वार्थ विरहीत कार्यकर्ता कसा असतो, हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिले. आरोप करणाऱ्यांना लोकशाही समजलीच नाही, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे.

Story img Loader