शिवसेनाप्रमुख हिंदुह्रयस्रमाट फक्त एकच होते आणि बाळासाहेबांसारखा दुसरा कोणी होणे नाही, असे सांगत उध्दव ठाकरे यांनी गेले काही दिवस या प्रश्नावरून रंगलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच शिवसेना कार्याध्यक्ष महाराष्ट्राच्या राज्यव्यापी दौ-यावर असून आज कोल्हापूर येथून या दौ-याला सुरूवात झाली. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी येथे आयोजित शिवसोना कार्यकर्त्यांच्या सभेत मार्गदर्शन केले.
बाळासाहेब ठाकरेंच्या पोटी जन्माला येण्याचं भाग्य मला मिळालं असं सांगत उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, बाळासाहेब तुमचं एकही स्वप्न, एकही इच्छा अपूर्ण राहू देणार नाही. हा राजकीय दौरा नसून माझ्या लाखो शिवसैनिकांना कुटुंबियांना भेटण्यासाठी हा दौरा, असंही ते पुढे म्हणाले. बाळासाहेबांना मी नेहमी लढताना पाहिलं आहे, त्यामुळे शिवसेनेच्या ताकदीचा उपयोग स्वार्थासाठी करणार नाही, असं उध्दव ठाकरे म्हणाले. बाळासाहेब आजही आपल्यामध्ये आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवून, विधानसभेवर भगवा फडकवणारच अशी शपथ त्यांनी कार्यकर्त्यांना घ्यायला लावली. मराठी माणूस आणि हिंदूंवरचे अन्याय सहन करणार नाही, असंही ते पुढे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा