वसई-विरार महापालिकेकडून ना हरकत परवानगी शुल्क माफ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेकडून ना हरकत परवानगी शुल्क आकारले जाते. परंतु यंदा करोनाच्या पाश्र्वभूमीवर वसई-विरार महापालिकेने परवानगी शुल्क १०० टक्के माफ केले आहे. यामुळे गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गणेशोत्सवानिमित्ताने दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिकेकडून मंडपासाठी आणि अग्निशमन विभागाकडून अग्निसुरक्षेसाठी तात्पुरते ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. त्यासाठी परवानगी शुल्क भरणे आवश्यक व बंधनकारक आहे.

परंतु या वर्षी करोनाच्या संकटामुळे मागील काही महिन्यांपासून टाळेबंदी सुरू आहे. या टाळेबंदीमुळे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यात यंदाचा गणेशोत्सव हा अगदी साधेपणाने साजरा केला जाणार आहे. त्यामुळे शुल्क माफ करावे, अशी मागणी करण्यात आली होती.

ही बाब लक्षात घेऊन पालिकेचे आयुक्त डी. गंगाथरन यांनी परवानगी शुल्कामध्ये मंडळांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी तसे आदेश प्रत्येक विभागाला दिले होते. परंतु यावर पालिका आयुक्तांनी पुन्हा फेरविचार व विचारविनिमय करून या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणे आणि अग्निशमन परवानगी यासाठी लागणारे शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

करोनाचे सावट असल्याने गणोशोत्सवाकरिता लागणारी मंडप परवानगी व अग्निशमन परवानगी असे एकूण शुल्क ४५०० रुपये सरसकट माफ केल्याचे जाहीर केले. तसे आदेश संबंधित प्रभाग समिती सहआयुक्तांना पालिकेचे आयुक्त डी. गंगाथरन यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.