औरंगाबाद येथील बेकायदा धार्मिक स्थळावर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात सोमवारी अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांपूर्वी वाळुंज परिसरातील बेकायदा मंदिरांवर कारवाई करताना तहसिलदार रमेश मुनलोड यांना खैरेंनी शिवीगाळ केली होती. यावेळी आक्रमक झालेल्या खैरेंचा अवतार प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांनी टिपला होता. हे राज्य मोदींचे आहे, मोगलांचे नव्हे, असेही खैरेंनी त्यावेळी तहसिलदारांना दर्डावून सांगितले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला या घटनेचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले होते.

Story img Loader