सांगली : आगामी लोकसभा निवडणुकीत आपण सांगलीतून मदानात उतरणार नसल्याचे पक्षाच्या नेत्यांना स्पष्टपणे सांगितले असून पक्ष जो उमेदवार देईल त्याच्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे, असे  प्रतिपादन आ. विश्वजित कदम यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आ. कदम यांनी अस्मिता बंगल्यावर माध्यमप्रतिनिधींशी संवाद साधत असताना सांगितले की,  पक्षाचे अध्यक्षपद  स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांनी सामान्य माणसांसाठी रस्त्यावरची लढाई सुरू केली. यातूनच नुकत्याच झालेल्या तीन राज्यात सत्तांतर घडवून आणू शकले. ५ राज्यात झालेल्या निवडणुकीत वारे बदलत असल्याचे दिसून आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला असून याचा फायदा निश्चितच पक्षाला मिळणार आहे.

सांगली जिल्ह्य़ातही वातावरण चांगले आहे, लोकसभेसाठी मी मदानात उतरणार नसल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगितले असून पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्याला निवडून आणण्यासाठी ताकदीने प्रयत्न करेन.

उमेदवार हा पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना  न्याय देणारा आणि रस्त्यावर उतरणारा असावा अशी आपली भूमिका आहे.

भाजपमधून बेदखल केलेले गोपीचंद पडळकर यांच्याशी झालेल्या चच्रेबाबत विचारले असता ते म्हणाले की, पक्षात येणाऱ्यांना पक्षाची दारे खुली आहेत, मात्र आमच्यात राजकीय चर्चा  झालेली नसली तरी पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहू. जिल्ह्य़ात काँग्रेसला पुन्हा ऊर्जतिावस्था यावी यासाठी डॉ. पतंगराव कदम यांची जयंती पार पडल्यानंतर पूर्ण जिल्हा दौरा करणार असल्याचेही आ. कदम यांनी सांगितले.

Story img Loader