सावंतवाडी तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत नोटाचा १२५१ मतदारांनी ठसा उमटविला आहे. तळवडेमध्ये २४२ मतदारांनी नोटाचा वापर करून राजकीय पक्षांना धक्का दिला आहे. मतदान केंद्रावर जाऊन उमेदवारांना मतदानच करायचे नाही असा ग्रामीण भागातील मतदारांचा कौल राजकीय पक्षांना मंथन करणारा ठरला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत नोटाचा वापर करणाऱ्या ग्रामपंचायतींमधील मतदार व ग्रामपंचायत तळवडे २४२, मळगांव १९८, कोलगाव १५६, आंबोली १७५, आरोंदा १४५, इन्सुली १७८, दांडेली ३८, आरोस ४०, डिंगणे ५७, भोमवाडी ५, सातुळी १०, माडखोल ७ अशा १२ ग्रामपंचायतींतील १ हजार २५१ मतदारांनी नोटाचा वापर केला आहे.
सावंतवाडी तालुक्यात १० सार्वत्रिक, तर ३ पोटनिवडणुका ग्रामपंचायतींच्या झाल्या. चौकुळमध्ये उमेदवारच उभे राहिले नाहीत, त्यामुळे या ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक झाली नाही.
ग्रामीण भागात मतदार नोटाचा वापर करत आहेत हे ग्रामपंचायत निवडणुकींत उघड झाल्याने राजकीय पक्षांना विचारमंथन करण्याची वेळ आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा