शेतक-यांच्यासह विविध देणी भागविण्यासाठी सांगलीच्या वसंतदादा साखर कारखान्याची २१ एकर जमीन विक्री करण्यासाठी सोमवारी लिलावाची नोटीस प्रसिध्द करण्यात आली. महापालिकेने बिगरशेतीचे रेखांकन तातडीने मंजूर करून लिलाव प्रक्रियेला गती दिली असली तरी साखर आयुक्तांच्या आदेशाने कारखान्याची मालमत्ता जप्तीची दुसरी नोटीस बजावून शासनाचे नाव लावण्यासाठी कार्यवाही सुरूच ठेवली आहे.
शेतक-यांच्या गाळप केलेल्या उसाचे अद्याप ४३ कोटीचे देणे द्यायचे आहे. याबाबत शेतक-यांनी साखर आयुक्तांकडे तक्रारी करताच जिल्हाधिका-याना साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतक-यांची देणी भागविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुस-या बाजूला विक्री कराची दीड कोटीची थकबाकी भरली नाही म्हणून विक्री कर विभागाने कारखान्याची शिल्लक साखर सुमारे १४ हजार पोती सील केली आहेत. कारखान्यावर आजघडीला विविध बँका, शेतकरी वाहतूकदार व व्यापारी यांचे २३५ कोटींचे देणे आहे.
आíथक अडचणीत सापडलेल्या वसंतदादा साखर कारखान्याला २१ एकर जमीन विक्री करण्यास मंजुरी देत असताना येणा-या रकमेपकी ५० टक्के रक्कम जिल्हा मध्यवर्ती बंॅकेला देण्याची अट घातली आहे. विक्री समितीमध्ये जिल्हा बँकेचे प्रशासक, साखर आयुक्त व कारखाना प्रतिनिधी यांचा समावेश असून ठोक जमीन विक्री केली तर कमी किंमत येईल म्हणून प्लॉट विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विक्री करण्यात येणा-या २१ एकराच्या भूखंडाचे १०३ प्लॉट पाडण्यात आले असून पाच हजार चौरस फुटापासून २५ हजार चौरस फुटाचे १०३ प्लॉट पाडण्यात आले आहेत. निविदा फी प्रत्येक प्लॉटसाठी १५०० रूपये असून बयाणा रकमेपोटी किमान २० ते २५ कोटी रूपये जमा होतील असा अंदाज आहे. प्रत्येक प्लॉटसाठी किमान एका ग्राहकाने निविदा भरली तरी बयाणा रकमेपोटी कारखान्याला ५ कोटी अडीच लाख रूपये जमा होणार आहेत.
कारखान्याने विक्री करण्यास निश्चित केलेल्या भूखंडावर दर्शनी भागात कारखान्याचे संस्थापक वसंतदादांचा पूर्णाकृती पुतळा सध्या आहे. महापालिकेने रेखांकन मंजूर करीत असताना या जागेचा विनियोग खुली जागा म्हणून केल्यामुळे दादांचा पुतळा वाचविण्यात आला आहे. निविदा प्रसिध्द करीत असताना किमान देकार रकमेची अट टाळण्यात आली असून जमीन विक्रीतून जास्तीत जास्त रक्कम मिळावी या हेतूने ही अट टाळण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा