वाई : सह्याद्री वाचवा मोहिमेतंर्गत कोयना खोऱ्यातील झाडानी येथील तिघांना कमाल जमीन धारणा कायद्याचे उल्लंघन झाल्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीसा बजावल्या होत्या. चाळीस एकरावरील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणाला आणखी एक नवीन वळण मिळाले असून सखोल चौकशीअंती जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी आठ जणांना कमाल जमीन धारणा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीसा बजावल्या आहेत. सर्वांना गुरुवार दि.२० जून रोजी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील तब्बल ६२० एकर जमीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बळकावल्याचे कागदपत्रांवरुन स्पष्ट झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कमाल जमीन धारणेची कमाल मर्यादापेक्षा जास्त जमीन धारण केल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पियुष बोगीरवार यांना नोटीस काढली होती. याप्रकरणी ११ जून रोजी सुनावणी होऊन दि.२० जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. परंतु या प्रकरणाता सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी आठ जणांना कमाल जमीन धारणेतंर्गत नोटीसा काढल्या आहेत. यामध्ये पूर्वीचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पियुष बोगीरवार यांच्याबरोबरच त्यांचे नातेवाईक श्रीमती रत्नप्रभा अनिल वसावे, दिपेश अनिल वसावे, श्रीमती संगीता चंद्रकांत वळवी, श्रीमती अरुणा बोंडाळ, गौतम मोहन खांबदकोन, आरमान चंद्रकांत वळवी, आदित्य चंद्रकांत वळवी, दिपाली दिलीप मुक्कावार यांनाही नोटीसा काढल्या असून दि.२० जून रोजी आवश्यक ती कागदपत्रे आणि लेखी म्हणणे घेऊन उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

Rupali Chakankar On Vasai Case
वसईत तरुणीची निर्घृण हत्या, राज्य महिला आयोगाकडून घटनेची गंभीर दखल; रुपाली चाकणकरांनी पोलिसांना दिल्या ‘या’ सूचना
amol mitkari warning to bjp
“…तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल”, अजित पवार गटाच्या नेत्याचा भाजपाला इशारा!
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”
maharashtra ministers in modi govt
मोदींच्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळांकडे मोठी जबाबदारी? महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांकडे कोणती खाती?
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा

आणखी वाचा-सातारा : ‘कुर्बानीचा अर्थ नवा’ या अभियानाच्या अंतर्गत रक्तदान करून ईद साजरी

यादिवशी उपस्थित राहून कागदपत्रे सादर न केल्यास आपणास काही एक सांगावयाचे नाही असे गृहित धरून जास्तीची जमीन सरकार जमा करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही नोटीशीत देण्यात आला आहे.या प्रकरणी सहयाद्री वाचवा मोहिमेतील कार्यकर्ते व तक्रारदार सुशांत मोरे यांनीही कारवाई साठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. या प्रकरणात वन विभागाने कारवाईचे व अनधिकृत बांधकाम पडण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण तात्पुरते मागे घेतले होते. याप्रकारे लोकसत्ताने पहिले वृत्त प्रसिद्ध केल्याने सर्वत्र प्रबळ उडाली होती.