प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
वर्धा, इरई व वैनगंगा या प्रमुख नद्यांसह भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत प्रदूषित करणाऱ्या उद्योगांना व वेकोलि व्यवस्थापनाला उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रदूषित पाण्यामुळे लोकांना अनेक आजार होत असल्याची माहितीही समोर आली आहे.
प्रदूषणात देशात आघाडीवर असलेल्या या जिल्ह्य़ात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, बल्लारपूर पेपर मिल, सिमेंट उद्योग व वेकोलि यामुळे नद्या व भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होत असल्याचे समोर आले आहे. वेकोलिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर असतांना नाल्यात दूषित पाणी सोडले. रसायनयुक्त पाण्यामुळे संपूर्ण नाला पिवळा पडला आहे. या नाल्यालगतच ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे. या प्रकल्पातील बहुसंख्य वन्यप्राणी याच नाल्यावर पाणी पितात. दूषित पाणी पिल्यामुळे जनावरांचा मृत्यू होऊ शकतो. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर तक्रारी झाल्यानंतर प्रदूषण नियंत्रण विभागाने वेकोलिला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, तसेच गेल्या आठवडय़ात बिल्ट व्यवस्थापनाने रसायनयुक्त दूषित पाणी वर्धा नदीत सोडल्यामुळे या नदीचे पाणी पूर्णत: प्रदूषित झाले होते. या पाण्यात इतक्या मोठय़ा प्रमाणात रसायन होते की, पात्रातील पाण्यावर तेलाचा तवंग दिसत होता. याबाबतही प्रदूषण नियंत्रण विभागाकडे तक्रार होताच तातडीने नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या सर्व संचातून फ्लायअॅश, दूषित पाणी, कोळसा भुकटी सोडली जाते. ही संपूर्ण राख लगतच्या परिसरातील शेतात पसरल्यामुळे येथे शेती होत नाही. नदी पात्रातील पाण्यासोबतच भूगर्भातील पाण्याचे स्त्रोतही प्रदूषित करण्याचे काम वीज केंद्र, वेकोलि व बिल्टच्या माध्यमातून सुरू आहे. हे सारे लक्षात घेऊनच उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी एम.पी. जोशी यांनी वेकोलिला कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. सात दिवसांत म्हणणे सादर करा; अन्यथा कारवाई करू, असे निर्देश दिले आहेत.