कुख्यात गुंड सलीम शेख उर्फ सल्या चेप्या याच्यावर दाखल असलेल्या तेरा गुन्ह्यांची माहिती संकलित करण्याचे काम सध्या गतीने सुरू आहे. सल्या चेप्यासह त्याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आल्यामुळे या प्रकरणाचा तपास आता पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर करीत असून, या कारवाईची नोटीस आरोपींना बजावण्याच्या सूचना त्यांनी पथकाला दिल्या आहेत.
सलिम महंमद शेख उर्फ सल्या चेप्याच्या मालमत्तेचीही चौकशी होणार असल्याने या कारवाईकडे लोकांच्या नजरा लागून राहणार आहेत. दरम्यान, ‘मोक्का’ अन्वये कारवाईचा अहवाल उपाधीक्षक शिवणकर यांनी विशेष न्यायालयात सादर केला. सल्याने प्रत्येकवेळी वेगवेगळय़ा साथीदारांना सोबत घेऊन गुन्हा केला आहे. त्या साथीदारांचीही पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. तसेच, गत १० वर्षांतील तेरा गंभीर गुन्ह्यांची यादीही पोलिसांनी तयार केली असून, या गुन्ह्यांचा तपास करतानाच बबलू माने खून प्रकरणाची आणखी चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Story img Loader