शिवसेना(ठाकरे गट) नेते अनिल परब यांच्या तब्बल १०.२० कोटींच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचलनालयाने तात्पुरती जप्ती आणली आहे. यावरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी एक सूचक विधान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“अखेर अनिल परबांचा हिशोब होतोय, ईडीने अनिल परबांवर कारवाई सुरू केली आहे. आता तर अनिल परबांची मालमत्ता साई रिसॉर्ट जप्त होतेय नंतर अनिल परबही…” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

अनिल परब यांच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये रत्नागिरीतील ४२ गुंठे जमीन व त्यावर बांधण्यात आलेल्या साई रिसॉर्टचा समावेश असून, त्याची किमत ७ कोटी ४६ लाख ४७ हजार असल्याचे समजते.

पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अनिल दत्तात्रय परब, मेसर्स साई रिसॉर्ट, मेसर्स सी शंख रिसॉर्ट आणि इतरांविरुद्ध दापोलीतील न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) तपास सुरू केला आहे.

पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ च्या कलमांचे उल्लंघन झाल्याने अनिल परब आणि इतरांविरुद्ध राज्य सरकारची फसवणूक आणि नुकसान केल्याबद्दल दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ईडीने सविस्तर परिपत्रकही जाहीर केले आहे.

किरीट सोमय्या यांनी ३१ डिसेंबर रोजीच ट्विट करत ठाकरे गटाचे नेते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची यादी जाहीर केली होती. या नेत्यांवर नव्या वर्षात मोठी कारवाई होणार, असेही त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आता अनिल परब यांच्यावर पहिली कारवाई झाली आहे.