दहा वर्षांच्या मुलाला कर्करोग होतो मग लहान मुलेही सिगरेट ओढत असतात व तंबाखू खात असतात काय, असा प्रतिप्रश्न करीत भाजप खासदार दिलीप गांधी यांनी तंबाखूमुळे कर्करोग होत नाही; उलट ती पचनाला चांगली असते असा अगम्य दावा केला. श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव त्यांनी पंतप्रधानांच्या दत्तक गाव योजनेनुसार दत्तक घेतले असून त्या वेळी आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते.
पत्रकारांनी तंबाखूच्या वापराबाबत छेडले असता त्यांनी तंबाखूमुळे कर्करोग तर होत नाहीच, उलट पचनशक्ती सुधारते असा दावा त्यांनी केला. दिलीप गांधी हे धूम्रपानविरोधी कायदा सुधारणेचे सदस्य असून त्यांनीच पहिल्यांदा तंबाखूमुळे कर्करोग होतो असे पुरावे कुठल्याही भारतीय संशोधनात नाहीत असा दावा करून खळबळ उडवून दिली होती. तंबाखूजन्य उत्पादनांवरील धोक्याचे चित्र ४० टक्क्यांवरून ८० टक्के करण्याची सूचनाही लांबणीवर टाकण्यात आली आहे. गांधी यांनी अलीकडेच केलेल्या विधानावर पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांना घरचा आहेर देताना त्यांची विधाने मूर्खपणाची व अज्ञानमूलक असल्याची टीका केली होती. प्रत्यक्षात भारतीय वैद्यक संशोधन संस्थेनेही याबाबत संशोधन केलेले असून तंबाखूमुळे कर्करोग होत असल्याचे निष्कर्ष आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा