प्रवासी आणि पर्यटकांचा प्रवास अधिक आरामदायक करण्याचा प्रयत्न म्हणून कोकण रेल्वेमार्गावर फोन करून तक्रार नोंदविण्याची नवी सुविधा सुरू करण्यात आली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वीच या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले होते.
त्यामुळे आता कोकण रेल्वेचे प्रवासी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या थेट रेल्वे प्रशासनासमोर मांडू शकतील. प्रवासी १८००२६६५७२५ या टोल-फ्री क्रमांकारवर आपल्या तक्रारी नोंदवू शकणार आहेत. क्रमांक डायल केल्यानंतर, प्रवाशी त्यांची तक्रार रेकॉर्ड करू शकतात. फोन केल्यावर एक ऑडिओ फाइल तयार होते व कोकण रेल्वे अधिकाऱ्यांतर्फे त्याची थेट दखल घेतली जाते. त्यानंतर या अधिकाऱ्यांमार्फत तक्रारीचे निवारण करून संबंधित तक्रारदाराला एसएमएसद्दारे त्याविषयी कळविण्यात येते.

Story img Loader