लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे तीन दिवसांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान बारामतीमधील काही कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेत मोठी मागणी केली आहे. आम्हाला आता बारामतची दादा बदलायचा आहे, अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीतून काका-पुतण्या यांची थेट लढत असणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरून खुद्द युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

“मला संधी मिळाली अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ते मला सांगून असं काही करत नाहीत. त्यांनाही थांबा असंही बोलता येत नाही. त्यांच्यात उत्साह असतो. त्यांनाही काही काही करायचं असतं. आता मी साहेबांबरोबर खूप फिरलोय. आताही फिरतोय. मलाही माझ्या कुटुंबाशी बोलावं लागेल. शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत, परंतु, जयंत पाटील, सुप्रिया सुळेंशी बोलून चर्चा करून पुढे बघू”, अशी सूचक प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी दिली आहे. त्यांच्या बोलण्यावरून तेही उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं स्पष्ट होतंय.

David Shaw has used concept of quant when managing assets of his investors
बाजारातली माणसं : हेज फंड बाजारातली एक रहस्यकथा – डेव्हीड शॉ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
supreme court rejects sebi penalty on mukesh ambani In rpl shares case
सर्वोच्च न्यायालयाचा मुकेश अंबानींना दिलासा; ‘आरपीएल शेअर्स’प्रकरणी ‘सॅट’च्या आदेशाला सेबीचे आव्हान फेटाळले!
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच

हेही वाचा >> Ajit Pawar vs Yugendra Pawar: पुतण्या काकाचा पराभव करणार का? कोण आहेत युगेंद्र पवार?

कार्यकर्त्यांनी नेमकी काय मागणी केली?

“आम्हाला आता बारामतीचा दादा बदलायचा आहे. बारामतीत शांत दादा आणायचा आहे. गाव पुढाऱ्यांपुढे आमचं काही चालत नाही. युगेंद्र पवारांना संधी द्या, आमचं त्यांच्यावर लक्ष आहे, पण तुमचंही लक्ष असूद्या एवढीच आमची इच्छा आहे. त्यांना तुम्ही ताकद द्या, आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे”, अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी शरद पवारांकडे केली. “उमेदवारीची चर्चा आता करु नका. लवकरच काय ते होईल. संयमी राहा”, असा सल्ला शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीसारखं विधानसभेच्या निवडणुकीत बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार का?, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अजित यांनी १.९५ लाख मतांनी मतदारसंघ जिंकला होता. १९९१ पासून सात्यत्याने विजय मिळवत आलेल्या अजित पवारांना पुतण्याकडून मात मिळणार का? याबाबत आता बारामतीच्या राजकारणात चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार कोण आहेत आणि का महत्त्वाचे याविषयी जाणून घेणे महत्त्वाचे ठरणारे आहे.

कोण आहेत युगेंद्र पवार?

३३ वर्षांचे युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास यांचे पुत्र आहेत. श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे मोठे बंधू आहेत. ते उद्योजक असून कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील ते व्यवसायिक आहेत. अजित पवार हे आपल्या आयुष्यातला प्रत्येक महत्त्वाचा निर्णय श्रीनिवास पवारांशी चर्चा करुन घेतात असं कायमच सांगितलं जातं. श्रीनिवास पवार हे राजकारणात सक्रिय नाहीत. मात्र कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ते कायमच दिसतात. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांची साथ सोडली.