सावंतवाडी: शासकीय धान खरेदी योजनेत शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी केली तरच धान खरेदी केले जात आहे. त्यामुळे यंदा मागील वर्षापेक्षा ६९२ पेक्षा जास्त शेतकरी योजनेपासून वंचित राहीले आहेत. त्यामुळे खासगी खरेदीदारांचे फावले आहे. यंदा भात खरेदी दर प्रति किलो २३०० रूपये अधिक बोनस दिला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शासनाच्या धान खरेदी योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४१ केंद्राच्या माध्यमातून ४१ केंद्राच्या माध्यमातून भात खरेदी सुरू आहे,ती येत्या मार्च अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे डी आर पाटील यांनी तसे सांगितले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा ४१ केंद्राच्या माध्यमातून ४४ हजार ८९५ क्विंटल भात आजपर्यंत ४१ केंद्राच्या माध्यमातून खरेदी करण्यात आली आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, यंदाच्या हंगामात ई पीक नोंदणी ४ हजार ७०८ शेतकऱ्यांनी केली आहे. इ पीक नोंदणी करणाऱ्यांना भात खरेदी नोंदणी करता येते.

गतवर्षी जिल्ह्यात ५ हजार ४०० शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी केली त्यावेळी ८४ हजार क्विंटल भात खरेदी करण्यात आले आहे. यंदा हिच ई पीक नोंदणी ४ हजार ७०८ शेतकऱ्यांनी केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ६९२ शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी केली नाही,हि संख्या घसरणीवर लागत असल्याने तो चिंतेचा विषय आहे.

ई पीक नोंदणी बाबत फेरआढावा हवा

सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांनी विचारले असता ते म्हणाले, ऑनलाईन पद्धतीने नोंदणी मध्ये शेतकरी सहभागी होत नाहीत. आम्ही शेतकरी मेळावा घेऊन जागृती केली. ग्रामीण भागात नेटवर्क नसते, उशीरापर्यंत पाऊस सुरू होता.अनेक महसूल मध्ये तलाठी पद रिक्त आहे. दरम्यान निवडणूक काळात तलाठी कार्यालयात उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकरी शासकीय धान योजनेपासून वंचित राहीले. याबाबत आम्ही शासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले परंतु महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने लक्ष दिले नाही. त्यामुळे बहुतेक शेतकरी योजनेपासून वंचित राहीले आहेत. त्यामुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी बाबत फेरआढावा घेऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी निर्णय झाला पाहिजे.