Laxman Hake: विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाला समर्थन देणारे ५० टक्के आमदार विधानसभेत पाठवणार असं मनोज जरांगे म्हणाले. त्यांच्या या घोषणेचं स्वागत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलं आहे. ओबीसी आरक्षणावर शब्दही न उच्चारणाऱ्या आमदारांना जरांगे पाडणार असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत असं आता लक्ष्मण हाकेंनी म्हटलं आहे.

काय म्हणाले लक्ष्मण हाके? (What Laxman Hake Said? )

“येत्या निवडणुकीत जर मराठा समाजाचे ५० टक्के आमदार मनोज जरांगे पाठवणार असतील तर त्याचं स्वागत आहे. पण त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने मराठा समाजाचे आमदार विधानसभेत आहेत. ओबीसींच्या हक्कांवर जे बोलत नाहीत असो लोक पराभूत झालेच पाहिजेत.”लक्ष्मण हाके म्हणाले की, “ओबीसी आरक्षणाच्या बाजूने या महाराष्ट्रातील कुठलाही आमदार लेखी पत्र द्यायला तयार नाही किंवा ओबीसींच्या सामाजिक न्यायाच्या रिझर्व्हेशन बाबत बोलायला तयार नाहीत. मग या सगळ्या लोकांना जर जरांगे पाटील पराभूत करणार असतील तर त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. कारण ही माणसं पराभूत झाली पाहिजे असं आमचंही मत आहे.”

delivery boy
“डिलिव्हरी बॉयचा संघर्ष कधीच कुणाला दिसत नाही!” VIDEO होतोय व्हायरल; नेटकरी म्हणाले ” डिलिव्हरी बॉयचा आदर करा”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
ajit pawar baramati assembly election
Ajit Pawar: “मी पेताड, गंजेडी असतो तर ठीक आहे, पण…”, अजित पवारांनी प्रतिभाताई पवारांचा भाषणात केला उल्लेख; म्हणाले…
Hashtag Tadev Lagnam
तेजश्री प्रधान-सुबोध भावे पहिल्यांदाच एकत्र झळकणार; ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
suraj chavan shares reel video on riteish deshmukh ved song
रितेश देशमुखच्या सुपरहिट मराठी गाण्यावर सूरजचा जबरदस्त अंदाज! Video पाहून नेटकरी म्हणाले, “लय भारी…”
people are lucky who got love from grandma emotional video
“आजी म्हणजे काय?” VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ” ज्या लोकांना आज्जीचे प्रेम मिळाले…”
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”

पश्चिम महाराष्ट्रात आम्ही लवकरच निर्णय घेऊ

ओबीसी आरक्षणाच्या मागणीच्या पाठिंब्याबाबत जर लोकप्रतिनिधीनींनी जर योग्य निर्णय घेतला नाही तर ओबीसी समाजही लोकप्रतिनिधीच्या बाबत निर्णय घेतील अशी भूमिका मराठवाड्यातील बैठकीत घेण्यात आल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले. पश्चिम महाराष्ट्रामध्येही लवकरच निर्णय घेऊ असेही लक्ष्मण हाके ( Laxman Hake ) यांनी स्पष्ट केलं.

हे पण वाचा- “जेवढं गोडी गुलाबीने घ्याल तेवढं तुमच्यासाठी…”, मनोज जरांगेंचा फडणवीसांना पुन्हा इशारा

मनोज जरांगेंवर आधी केली होती टीका

लक्ष्मण हाके ( Laxman Hake ) यांनी ओबीसी आरक्षण बचाव जनाक्रोश यात्रा काढली होती. त्यावेळी त्यांनी मनो जरांगेंवर टीका केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की मनोज जरांगे यांची लढाई आरक्षणाची नाही तर वर्चस्वाची आहे. मनोज जरांगे निवडणूक लढवणार नाहीत हे माझ्याकडून कागदावर लिहून घ्या. तसंच ज्या मागण्या मान्य होणार नाहीत अशा मागण्या घेऊन ते आंदोलन करत आहेत. त्यांना सल्ला देणाऱ्यांनाही ही बाब माहीत आहे अशी टीका हाकेंनी केली होती. तसंच महापुरुषांच्या फोटोंसमोर बसून शिव्या देणारा माणूस फक्त तारीख पे तारीख देऊ शकतो दुसरं काही नाही असंही लक्ष्मण हाकेंनी ( Laxman Hake ) म्हटलं होतं. आता मात्र त्यांनी मनोज जरांगेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

manoj jarange laxman hake
लक्ष्मण हाके आंतरवाली सराटी येथे उपोषणाला होते, आता त्यांनी मनोज जरांगेंना एका कारणासाठी दिल्या शुभेच्छा !

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे हे आज सुनावणी असल्याने पुण्यात आले होते. त्यांची प्रकृती बरी नाही त्यामुळे ते रुग्णवाहिकेतून न्यायालयात हजर राहिले होते. न्यायालयाने त्यांना आज कोर्टाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करु नका अशी समज दिली आहे. त्यानंतर ते पुन्हा एकदा अंतरवलीला गेले आहेत. आज न्यायालयाने त्यांच्याविरोधातला अटक जामीनही रद्द केला आहे.