सांगली : ओबीसी आणि आमचे व्यवसाय एकच असताना त्यांना आरक्षण मिळते आणि मग आम्हाला का डावलले जात आहे, असा सवाल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सांगलीत उपस्थित केला.

जिल्ह्यात जरांगे यांच्या विटा, सांगली व इस्लामपूर येथे जाहीर सभा पार पडल्या. या वेळी ते म्हणाले, की ओबीसीमधील बहुतेक जाती या शेती व्यवसायच करतात. मग मराठा समाजही शेती करत असल्याने त्यांना या न्यायाने आरक्षण दिले पाहिजे. जर आमचे व्यवसाय एकच आहेत तर फरक काय? मग न्यायालयाकडून आम्हाला का डावलण्यात येत आहे. यासाठी सरकारला २४ डिसेंबपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर आंदोलनाची दिशा काय असेल हे ठरविण्यात येईल असेही त्यांनी या वेळी सांगितले.

Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
anup dhotre
काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’; अकोल्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींची टीका
Narendra Modi statement that Congress wants to end OBC reservation
काँग्रेसला ओबीसी आरक्षण संपवायचे -मोदी
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान
Clashes between BJP MLAs and marshals in the Assembly in Jammu and Kashmir
जम्मू-काश्मीर विधानसभेत धक्काबुक्की

हेही वाचा >>> भुजबळांचा सरकारवर हल्लाबोल; ओबीसींच्या ताटातून काढून घ्याल तर परिणाम भोगाल! जरांगेंवरही टीकास्त्र

जाती-जातींमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न

सांगली : जाती-जातींमध्ये वाद निर्माण करून राज्यातील शांतता व सुव्यवस्था अडचणीत आणण्याचा काहींचा प्रयत्न असून सरकारने यावर लक्ष ठेवावे, असे मत जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. मंत्री भुजबळ यांच्या भाषणावर ते बोलत होते.

ते म्हणाले, की तुम्ही आमच्या शेपटीवर पाय ठेवाल तर पुढे काय होईल याचा विचार करा. मी सासऱ्याच्या घरी राहण्यास असल्याची टीका करणाऱ्यांनी बीडमधील अनेक बांधव पाण्यासाठी गोदातीरी आले आहेत हे लक्षात घ्यावे. आम्ही आमच्या हक्काचे मागत आहे. कितीही टीका झाली तरी त्याकडे लक्ष द्यायचे नाही आणि त्यांना महत्त्वही द्यायचे नाही असे आपण ठरविले असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

विटा येथे जाहीर सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील