निमित्त दूध उत्पादक शेतकरी मेळाव्याचे आणि चर्चा मात्र गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची. हे चित्र होते शिरोळ येथे झालेल्या दूध उत्पादक मेळाव्यावेळचे. दूध उत्पादकांच्या हिताच्या बाबींना वक्त्यांनी स्पर्श केला खरा, पण मुख्य रोख होता तो मात्र सत्तारूढ आघाडी पुन्हा सत्तेवर आणण्याचा.
अध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाल्याने गोकुळचा देशात लौकिक वाढविण्याचे काम केले. मात्र काही जण केवळ निवडणुकीपुरत्या वल्गना करतात. अशा दुष्ट प्रवृत्तींना दूर ठेवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन गोकुळचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केले.
गोकुळ निवडणुकीचे रणिशग शिरोळमध्ये फुंकले गेले. या वेळी आयोजित दूध उत्पादक सभासदांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक अरुण नरके होते.
दिलीप पाटील म्हणाले, गोकुळने मागणी नसताना गेल्या वर्षांपासून ७ रुपयांची दरवाढ दिली. तालुक्यीतील ११७ पकी ११६ ठराव हे विद्यमान संचालक मंडळाच्या पाठीशी आहेत.
अरुण नरके म्हणाले, गोकुळ दूध संघाने सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. शिरोळ तालुक्याला दिलीप पाटील यांच्या रूपाने जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.
विश्वास पाटील म्हणाले, दूध उत्पादकांच्या सर्वागीण विकासाचा केंद्रिबदू असणाऱ्या गोकुळच्या निवडणुकीत आमदार महाडिक, पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल विजयी होईल.
रणजितसिंह पाटील म्हणाले, शिरोळ तालुक्याने एकसंधपणे ११७ पकी ११६ ठराव आम्हाला दिले आहेत. संपर्क दौऱ्याचा मान शिरोळ तालुक्याला मिळाला आहे. गेल्या १५ वर्षांपासूनची शिरोळची चििलग सेंटरची मागणी येत्या जुलैमध्ये पूर्ण होत असून अत्याधुनिक आणि सॅटेलाईट चििलग सेंटरमुळे संघ येथे दोन लाख लीटर दूधसंकलन करेल.
रवींद्र आपटे, माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, शेतकरी संघाचे माजी कार्यकारी संचालक यशवंत पाटील-टाकवडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा