सोलापूर जिल्ह्य़ात काही भागात अवकाळी पाऊस होऊन विजा कोसळल्याने घडलेल्या दुर्घटनेत तिघा जणांचा मृत्यू झाला. मोहोळ तालुक्यात ही दुर्घटना घडली. अक्कलकोटजवळ अवकाळी पावसात वादळी वा-यांमुळे दगड अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला.
मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे तनवीर पैगंबर तांबोळी (८) हा मुलगा मरण पावला. तर अर्जुनसोंड येथे सीताबाई हणमंत ढेरे (३७) व नंदा जयंत धावणे (४२) या शेतमजूर महिलांचा मृत्यू झाला. अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथे अवकाळी पाऊस वादळी वा-यांमुळे घरावरील छतावरील दगड अंगावर पडल्याने श्रीदेवी चन्नप्पा पाटील (४२) ही महिला मृत्युमुखी पडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा