नगर शहरासह जिल्ह्य़ातील अनेक ठिकाणी मंगळवारी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. नगर शहर, राहात्यात हलक्या सरी आल्या, मात्र कर्जत तालुक्यासह परिसरात जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
दहा दिवसांपूर्वी नगर शहरासह जिल्ह्य़ात विस्तृत प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. त्या वेळी तब्बल २४ तास जिल्हाभर रिपरिप सुरू होती. त्यातही शेतीचे मोठे नुकसान झाले असतानाच मंगळवारी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने चिंता व्यक्त होत आहे. नगर शहर व परिसरात सकाळपासून आभाळ येत होते. सायंकाळी सहाच्या सुमारास मात्र भुरभुर सुरू झाली. सुमारे तासभर ती सुरू होती.
कर्जतला गडगडाटासह पाऊस
कर्जतसह तालुक्यात सोमवारी मध्यरात्री विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडला. राशिन परिसरात शेतातील कडब्याच्या गंजीवर वीज पडल्याने तिने पेट घेतला होता. पावसासह जोरदार वा-यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीच्या पाहणीचे काम लगेचच सुरू केल्याची माहिती तहसीलदार जयसिंग भैसडे व तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी दिली. कर्जत शहरात १७ मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्यात मिरजगावला ५, राशिनला ३, भांबोरा २४ मिमी अशी नोंद झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा