जोरदार अवकाळी पावसाने पाचगणीला गुरुवारी झोडपून काढले विजेच्या कडकडाटात काल सांयकाळी पाचगणीत जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे पर्यटकांसह पाचगणीकरांची चागलीच त्रेधातिरपीट उडाली. या पावसात पर्यटकांसह नागरिकांनीही भिजण्याची आपली हौस पूर्ण करून घेतली.
काल सकाळीपासून वातावरणात उष्मा जाणवत होता. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती. मागील दोनतीन दिवसांपासून पाऊस येत होता पण त्यामुळे वातावरणात गारवा येत नव्हता. सुमारे तासभर जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने पर्यटकांची व बाजारपेठेत व्यापाऱ्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. पर्यटकांनी मात्र पावसात भिजण्याचा आनंद लुटला. पाचगणीलगतच्या भिलार, आब्रळ, खिंगर, दानवली, भोसे या गामीण परिसरातही जोरदार पाऊस झाला. पण या पावसाने स्टॉबेरी पिकाचे कोणतेही नुकसान झाले नाही.

Story img Loader