भारतरत्न डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या प्रतिमा विटंबनाप्रकरणी आरपीआयने पुकारलेल्या सातारा बंदला नागरिक, व्यापारीवर्गाने प्रतिसाद दिला. गावात शुकशुकाट होता तर वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद असल्याने प्रवाशांचे अत्यंत हाल झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा विटंबनाप्रकरणी आरपीआयने सोमवारी सातारा बंदचे आवाहन केले होते. या बंद मध्ये सर्वसामान्यांचे तसेच हातावर पोट असणा-यांचे हाल झाले. आठ दिवसात तीन वेळा बंद पुकारल्याने आíथक फटका या मंडळींना बसला आहे. त्याच बरोबर महामानवांचे अवमान होणार नाहीत यासाठी चोख व्यवस्था शासनाने निर्माण केली पाहिजे अशी प्रतिक्रियाही या मंडळींनी दिली.
सकाळपासून वाहतूक पूर्णपणे बंद होती. आरपीआयचे कार्यकत्रे दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याची विनंती करत होते. त्यांच्या विनंतीवरून दुकानदारांनी दुकाने बंद केली. जीवनावश्यक बाबींची अर्थात औषधाची दुकाने सुरू होती. पोलीस बंदोबस्त चोख होता. पोवईनाका, राजवाडा, मोतीचौक या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाजारपेठ पूर्ण बंद होती त्यामुळे बँकांमध्ये गर्दी नव्हती. एरवी अत्यंत गजबजलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट पसरल्याने रस्त्यावर क्रिकेटचा डाव रंगला होता.
प्रतिमा विटंबनाप्रकरणी साता-यात बंद
भारतरत्न डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या प्रतिमा विटंबनाप्रकरणी आरपीआयने पुकारलेल्या सातारा बंदला नागरिक, व्यापारीवर्गाने प्रतिसाद दिला. गावात शुकशुकाट होता तर वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद असल्याने प्रवाशांचे अत्यंत हाल झाले.
First published on: 10-06-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Off in satara due to disgrace of dr ambedkar